Tuesday, July 3, 2018

संवेदनशीलतेमुळेच मानवउत्क्रांती होते - किरणकुमार गित्ते



आधार माणूसकीचा उपक्रमाद्वारे मयत शेतकऱ्यांच्या मुलांना व अनाथ मुलांना विविध वस्तुंचे वाटप
अंबाजोगाई : प्रतिनिधी
सामाजिक स्थत्यंतरे बदलत आहेत एकीकडे वैज्ञानिक क्रांती मोठ्या प्रमाणात होत असली तरी मानवी मन कोते बनत चालले आहे. अशा काळात काही संस्था व काही व्यक्ती सामाजिक काम व सामाजिक दायित्व म्हणुन पुढे आलेले आहेत. जे समाजासाठी समर्पित भावनेने काम करीत आहेत. संवेदनशीलता हा माणसाच्या अंगातील चांगुलपणा आहे. आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने मानव उत्क्रांती होते. अंबाजोगाई शहराला संघर्षाचा व संवेदनशीलतेचा इतिहास असल्याने या भागातील चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी समाजासाठी काम करीत आहेत. संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था अंतर्गत ऍड.संतोष पवार यांच्या प्रयत्नातून "आधार माणुसकीचा" उपक्रम अंतर्गत शेतकरी आत्महत्या केलेल्या व एच आय व्ही बाधीत गरिब कुटुंबातील 206 मुलांना  शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्याचीं शिक्षण व आरोग्याची जवाबदारी संस्थे ने स्वीकारली आहे. त्यामुळे अशा संस्था या भुषणावह बाब असल्यामूळे सामाजातील  चांगल्या लोकांनी "आधार माणुसकीचा" उपक्रम।च्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन पुणे येथील पी.एम.आर.डी.सी.चे आयुक्त किरणकुमार गित्ते यांनी व्यक्त केले. 
गित्ते हे आधार माणुसकीचा या उपक्रमाअंतर्गत शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील 206 मुलांना शालेय साहित्य,ड्रेस व मातांना साडी-चोळी वाटप व गुणवंत विध्यार्थी चा सत्कार।च्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ.द्वारकादास लोहिया, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष रूईकर, सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे, स्वाराती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, मुंबई येथील महानगर पालिका अभियंता असोसीएशनचे नवनाथराव घाडगे, श्री खडकभावी सर,डॉ नवनाथ घूगे,नवनिर्वाचित न्यायाधीश शलाका लोमटे (सोळंके) आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना किरणकुमार गित्ते पुढे म्हणाले की, सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात दुःख आहे. हे निवारण्यासाठी अनेक संस्था व प्रशासन प्रयत्नशील असते. सर्वांचे दुःख व समस्या वेगवेगळ्या आहेत. त्याचे संपुर्ण निराकरण होणे. शक्य नसते तरी देखील समाजातील सेवाभावी संस्था या सामाजिक जाणिवेतून काम करतात आणि समाजाचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामिण भागात निसर्गाचा असमतोल वाढल्यामुळे शेती व्यवसाय हा पुर्णतः मोडीत निघाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्‌या प्रमाणात उद्वस्त होत आहे. त्यावर मात करणे हा पर्याय असतो. परंतु शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबणे चुकीचे आहे. एका उद्योगावर राहण्यापेक्षा इतर ही उद्योगात व व्यवसायात शिरले पाहिजे तर आपण सर्व आर्थिक दृष्टया संपन्न होवू शेतीचं गणीत बिघडल असेल परंतु तोच एकमेव व्यवसाय न मानता इतर क्षेत्रात काम करावे अशी आपेक्षा व्यक्त करत. याच बरोबर बाजार व्यवस्था देखील शेतकऱ्यांचे   कंबरडे मोडण्यास कारणीभूत आहेत. आर्थिक विवंचना ही एक मोठी समस्या असून यावर मात करण्यासाठी स्वतःपुढे येण्याची गरज आहे. अशा ही परिस्थितीत समाजाचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न समाजातील विविध स्तरातील मान्यवर, संस्था, प्रतिष्ठाणे प्रयत्नशील आहेत. मोठ्या प्रमाणात महानगरातून सेवाभावी संस्थांना सहकार्य केले जात आहे. अंबाजोगाई येथे संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था ही सामाजिक जाणिवेतून आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या उभारीसाठी पुढे आली आहे. त्यांच्या पाल्ल्याचे शिक्षण, सांभाळ,दत्तक घेेणे असे उपक्रम घेत आहेत. ऍड.संतोष पवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासुन राबविला जात आहे. पवार यांची अफाट मेहनत, परिश्रम आणि समाजाप्रती त्यांची कृतज्ञता पाहिली तर असे तरूण आपल्या बीड जिल्ह्यात असल्याचा अभिमान वाटतो. अशा एकट्‌या नव्हे तर असंख्य संतोष पवारांची महाराष्ट्राला गरज आहे. पवार यांच्या उपक्रमाला शुभेच्छा देवून प्रशासकीय पातळीवर त्यांना जे सहकार्य अपेक्षीत आहे. ते देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे गित्ते यांनी सांगितले.


या प्रसंगी डॉ सुधीर देशमुख, डॉ नवनाथ घाडगे,श्री शिवकुमार स्वामी,श्री संतोष रुईकर,डॉ नवनाथ घुगे या मान्यवरांनी "आधार माणुसकीचा"उपक्रमांचे कौतुक करून,या उपक्रमासाठी भविष्यात सर्वंतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.मान्यवरांच्या हस्ते आत्महत्या ग्रस्त शेतकरी पाल्यांना शैक्षणिक साहित्य,ड्रेस,वृक्ष व मातांना साडी-चौळीचे वाटप करण्यात आले,व उपस्थित कुटुंबातील लोकांना धोंडे जेवण देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे अध्यक्ष ऍड संतोष पवार यांनी केले, तर संचलन सौ जोती शिंदे, आभार श्री अनंत निकते यांनी मानले.या भावस्पर्ष कार्यक्रमास श्री दिनकर मुंडे गुरुजी,श्री रामराव गित्ते, श्री प्रदिप खाडे,श्री मनोज गित्ते,श्री अभिजित देशपांडे,श्री सुभाष बाहेती,मैत्री ग्रुपचे सदस्य,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम।च्या यशस्वीतेसाठी समाज बांधवानी मदत केली.