परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा १५ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता परळी वैजनाथ येथील बस स्थानक परिसर स्वच्छ करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. "कोणत्याही गावाचा परिचय बाहेर गावांतील लोकांना गावच्या बस स्थानकावरून होत असतो. गावांतील बहुसंख्य लोकदेखील वाहतुकीसाठी बसचा वापर करतात. बस स्थानक परिसरात वर्दळीमुळे घाणही होत असते त्यामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक असते म्हणून ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बस स्थानक स्वच्छता आयोजन करण्यात आले आहे" अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी दिली.
स्वातंत्र्यानंतर सहा दशके झाली, तरीही आपण या क्षेत्रात फारशी प्रगती करू शकलो नाही. या देशातील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ ठेवण्यातच धन्यता मानणाऱ्या व्यक्तींमध्ये हा संस्कार रुजवण्यासाठी याद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. कोणालाही स्वच्छता हा विषय महत्त्वाचा आहे, असे जाणवतच नाही, म्हणून घडते आहे. त्यामुळे कुणालाही सार्वजनिक कचराकुंडी आपल्या दारात नको असते. कचरा निर्माण करणाऱ्यांना विल्हेवाटीचे कर्तव्य पार पाडण्याची आवश्यकता वाटत नाही. स्वच्छता हा संस्कार म्हणून रुजवण्याचे अतिशय अवघड आव्हान पेलण्याचे ध्येय डॉ. संतोष मुंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले आहे.
"प्रत्येकाने गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छतेची शपथ घेणे, सरकारी कार्यालये, बँका अणि शाळांमध्ये सुटी असतानाही स्वच्छतेचे काम करणे, हे प्रतीकात्मक राहू नये आणि ती जगण्याची रीत व्हावी, यासाठी सर्व स्तरांवर मनापासून काम होण्याची आवश्यकता आहे. प्रगत देशात जाऊन आलेला प्रत्येक भारतीय तेथील स्वच्छता पाहून अचंबित होतो. असे आपल्या देशात घडणे शक्य नाही, अशीही त्याची खात्री असते. गलिच्छ देश म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या भारताकडे मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले जात असतानाही, येथील सामाजिक अव्यवस्था या सगळ्या विकासाला खीळ घालत असते, याचे भान ठेवले, तर स्वच्छता अशा प्रकारच्या अभियानात मनापासून सहभागी होणे, ही प्रतिष्ठेचीही खूण ठरू शकेल." अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक डॉ.संतोष मुंडेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. संतोष मुंडें तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,शहराध्यक्ष सय्यद सिराज, तालुका उपाध्यक्ष रवि आघाव, अँड.सतिश काळे, बळीराम नागरगोजे, गोविंद कराड, संदिप दिवटे, सोमनाथ फड, नितीन निर्मळ, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवटे, शहराध्यक्ष अनंत ढोपरे, कार्याध्यक्ष प्रतिक बद्दर, ज्ञानेश्वर बळवंत, शेख शाहेद, अमित केंद्रे, अनिल गुट्टे, अतुल फड, अय्या रफिक पटेल, जाधवर, ज्ञानेश्वर होळंबे, गजानन मनाळे, बाळु चव्हाण, अमोल सुर्यवंशी, शेख हाकीम प्रताप संमीदर, इलियास पठाण, उमर पठाण, वैभव गुट्टे, उमर बागवान, नरेश सुरवसे, सुनिल बळवंत, श्रीकांत बळवंत, सोमनाथ लंगडे, गणेश शिंदे, शरद चव्हाण, शे.शम्मो, सतिष गंजेवार, सचिन नखाते, शे. अल्ताफ, रोहित मोदी, रंजित सुगरे, राज जगतकर, प्रकाश कदम, सय्यद सरताज, शे.तज्जामूल, लक्ष्मण कलमे, आदींनी केले आहे.
