परळी (प्रतिनिधी) : माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉगे्रसचे विधिमंडळ गटनेते मा. आ. अजितदादा पवार व विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते मा.ना. धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद स्वच्छता समितीच्यावतिने शहरात स्वच्छता सप्ताह राबविण्यात येणार असुन स्वच्छ परळी साठी दि.15 जुलै दरम्यान परळी शहरातील शासकिय, निमशासकिय कार्यालय, धार्मिक स्थळांच्या परिसराची स्वच्छाता करण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत शहरातील नागरिक व प्रशासकिय अधिकार्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन न.प.चे स्वच्छता सभापती विजय भोयटे यांनी केले आहे.
मा.आ. अजितदादा पवार व मा.त.ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त न.प.स्वच्छता विभागाच्या वतीने दि.15 जुलै ते 22 जुलै पर्यंत शहरातील शासकिय, निमशासकिय कार्यालये तसेच सर्व धार्मिक स्थळे व मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असुन या मोहिमेचा शुभारंभ दि.15 जुलै रोजी सकाळी 7 वाजता नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड, जि.प. सदस्य अजयजी मुंडे,माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, बांधकाम सभापती रेहनाबी शेख शरीफ ,शिक्षण सभापती गोपाळ आंधळे,पाणी पुरवठा सभापमती सौ. प्राजक्ता भावडया कराड, महिला व बालकल्याण सभापती सौ. मिना पांडूरंग गायकवाड, उपसभापती सौ. कमलबाई कु कर,माजी सभापती तथा नगरसेवक शरदभाऊ मुंडे, चंदुलाल बियाणी,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दिपक देशमुख व सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितील प्रभु वैद्यनाथाच्या मंदिर परिसरापासून केला जाणार आहे. या मोहिमेअंर्तगत दि.15 जुलै रोजी वैद्यनाथ मंदिर दि.16 रोजी शहर व संभाजी पोलिस स्टेशन व पाँवर हाऊस, परिसर दि.18 रोजी सिंचन भवन च न्यायालय परिसर, दि.18 रोजी उपजिल्हा रूग्णालय व गटशिक्षण अधिकारी दि.19 जुलै रोजी पत्रकार भवन व पेाष्ट अॅाफि स दि.20 रोजी टेलीफ ोन कार्यालय व पंचायत समिती कार्यालय दि.22 रोजी प्रा.आ. केंद्र खंडोबा मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, सावता माळी मंदिर परिसर तर दि. 22 रोजी बाजार समिती व हनुमान मंदिर मोंढा परिसराची स्वच्छाता करण्यात येणार आहे.
या स्वच्छता सप्ताहात स्वच्छतेसाठी न.प.तील स्वच्छता कर्मचारी व अधिकार्यांच्या वेगवेगळया टिम तयार करण्यात आल्या असून या मोहिमेत परळी शहरातील नागरिक, प्रशासकिय अधिकारी यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजक तथा न.प.चे स्वच्छता सभापती विजय भोयटे व स्वच्छता विभागाच्या वतिने करण्यात आले आहे.
