परळी वै : प्रतिनिधी
परळी वै तालुक्यातील तळेगाव येथे संजय मुंडे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाच्या निमित्ताने शुक्रवार दि.१७ रोजी रात्रौ ९ ते ११ संत साहित्याचे गाढे अभ्यासक व युवा प्रचारक प.पू स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांचे कीर्तन झाले
यावेळी, भगवंताच्या प्राप्तीसाठी चित्त निर्मळ ठेवणे महत्वाचे आहे आणी निर्मळ चित्तासाठी भगवंताच्या चरणावर मन स्थिर ठेवले पाहिजे स्थिर मनाने कुठलीही साधना केल्यास ती फलद्रुप ठरते. “सर्व काळ चित्त ठायी | राहो पायी तुमचिये ||” या अभंगाचा भावार्थ महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून सांगितला शुद्ध स्वरूपाच्या ज्ञानाने आत्मऊन्नातीचा मार्ग मोकळा होतो.चित्त प्रसन्न असल्यास संसारातील कोणतेही दुःख मनात प्रवेश करू शकत नाही चित्ताची प्रसन्नता ही मानवी जीवनात अतिशय महत्त्वाची आहे. संतांचे मागणे, देवाचे मागणे, राक्षसाचे मागणे व सामान्य जीवांचे मागणे यात मोठा फरक आढळून येतो म्हणून संतांनी जे मागणे देवाकडे मागितले आहे त्याचे सर्वांनी अनुकरण करावे असे प्रतिपदान प.पू स्वामी डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले प्रसंगी भरत महाराज सोडगिर, मनोहर मुंडे, राजेभाऊ फड ,जगदीश सोनवणे, दत्ता सोनवणे, मुरली मुंडे व भजनी मंडळी यांनी किर्तनास साथ दिली यावेळी मा.सभापती सूर्यभान मुंडे, डॉ.दे.घ मुंडे, माऊली मुंडे, बंडू गुट्टे, अच्युत गुट्टे, जमदाग्नी फड यांसह तळेगाव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.