Wednesday, August 22, 2018

गंगापुजन दिनी वृक्षारोपण ;डिघोळ येथील बोकन परिवाराचा आदर्श उपक्रम



सोनपेठ(प्रतिनिधी)
तालूक्यातील मौ. डिघोळ (देवीचे) येथील ज्येष्ठ गोपाळराव बोकन यांचे कांही दिवसांपुर्वी वार्धक्याने निधन झाले. दि.२०ऑगस्ट सोमवार रोजी त्यांचा दशक्रिया विधी गंगाखेड येथील गोदाकाठी संपन्न झाला. तत्पूर्वी त्यांचे चिरंजीव सेवानिवृत्त नायब सुभेदार शिवाजी बोकन यांनी स्वर्गीय पित्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासचे जिल्हाध्यक्ष तथा वृक्षमित्र महेश जाधव, जिल्हा सचिव माऊली आदत यांच्या सहयोगाने वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा सामाजिक संदेशच तमाम जनतेस दिला आहे. यावेळी बोलताना जाधव यांंनी परिसरातील वातावरण आरोग्यदायी राखण्यासाठी व पर्यायाने मानवजातीचे आरोग्य  सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकांंनी किमान एकतरी झाड लावावे व, त्याचे पालकत्व स्वीकारून मुला बाळाप्रमाणे त्याचे संगोपन व संवर्धन करावे असे मत व्यक्त करून; स्वर्गीय पित्याच्या गंगापूजन दिनी शिवाजीराव बोकन यांनी केलेले वृक्षारोपण हे इतरांसाठी प्रेरणादायक आहे असे गौरवोद्गार काढले.

याकार्यक्रमास शिवाजी बोकन (सेवानिवृत्त नायब सुभेदार), सावली फौंडेशनचे सचिव अजय देशमुख, गावचे सरपंच गोकुळ आरबाड, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संटनेचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, सचिव माऊली आदत, हारकाळ, उदय ग्रिन इंडिया क्लबचे अध्यक्ष डॉ. दिपक काळे, नितीन हारकाळ, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, प्रा.डॉ.संतोष रणखांब, सहशिक्षक प्रशांत पारेकर, विनोद पारेकर, ग्रामस्थ सुभाष मुंडीक, प्रकाश टाक, दिपक डहाळे, संतोष मुंडीक, शंकर कांबळे, नातलग आदींची उपस्थिती होती.