Wednesday, August 22, 2018

परळीतील महिला व विद्यार्थिनींची सुरक्षा बीडच्या दामिनी पथकाच्या हातात



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)शहरातील महिला व विद्यार्थीनींना रोडरोमीओ कडुन होणारा त्रास रोखण्यात दोन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अपयशी पडत असल्याने बीडच्या दामिनी पथकाला परळी शहरात येवुन रोडरोमीओवर कारवाई करावी लागते हे लक्षण परळी पोलीस यंत्रनेला शोभणारे नसुन त्यांनी आता तरी जागे होवुन रोडरोमीओचां बंदोबस्त करण्यासाठी दामिनी पथक स्थापन करावे अशी मागणी महिलावर्गातुन होत आहे.

परळी शहरात शाळा,काँलेजला व शिकवणी साठी जाणाऱ्या विद्यार्थीनींना
सतत रोडरोमीओच्या टिंगळ टवाळीचा सामना करावा लागतो.काही टोळके चौका,चौकात थांबुन येणाऱ्या व जाणाऱ्या मुलींचा पाठलाग सुध्दा करायला घाबरत नसतात या प्रकारामुळे मुंलीच्या मनात अनाहुत भिती निर्माण होत असुन असे प्रकार त्या आपली शिकवणी बंद होईल म्हणुन घरी सुध्दा सांगायला घबरतात.तर काहींनी सांगीतले असता त्यांच्या पालकांनी त्यांचे शाळा, काँलेजला जाणे बंद केली आहे.
शहरात दोन पोलीस स्टेशन असुन महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकच नाही.तीन दिवसापुर्वी रोडरोमीओनी मोंढा भागात महिलांची टिंगळ टवाळी केली होती व महिलांनी पोलीस स्टेशन गाठुन सक्त कारवाईची मागणी केली होती.तर परळीत घडणाऱ्या या घटनेची दखल जिल्हा पोलीस अधिक्षकांनी घेवुन ताबडतोब बीड जिल्हा दामिनी पथकाचे प्रमुख पी.एस.आय माने यांना पथकासह परळीत  रोडरोमीओवर कारवाई करण्यास पाठवले.या पथकाने शहरातील शाळा,काँलेज व शिकवणी क्लाँसेस ठिकाणी पाळत ठेवुन 11रोडरोमीओनां ताब्यात घेवुन 8जणांना ताकीद देवुन सोडुन दिले तर 3जणांवर म.पो.अ.कलम110/117नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरिल कारवाई बीड जिल्हा दामिनी पथकाचे प्रमुख माने यांनी संभाजीनगर व शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली असुन या कारवाईत पो.का.सुनिल गर्जे,गोरख राठोड,रंजना सांगळे,वैशाली राठोड व जयश्री घोडके सहभागी होते.
सदर कारवाईने परळीतील रोडरोमीओंचे धाबे दणाणले असुन चांगलाच वचक बसल्याचे बोलले जात असुन महिलांच्या व मुलीच्यां सुरक्षेसाठी बीडच्या दामिनी पथकाला कारवाईसाठी यावे लागण्या पेक्षा परळी शहरात दामिनी पथक स्थापन करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे महिला,विद्यार्थीनीं व पालकवर्गातुन होत आहे.