सोमवार रोजी अंतराष्ट्रीय स्थरावर तबला वाद्यक जुगल बंदी - चैतन सोंदळे
परळी वै. : प्रतिनिधी
येथे सुरू असलेल्या श्रावण मासा निमित्त 82 वा तपोनुष्ठान सोहळयात माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर परिवाराने मोफत रूग्णसेवा व शस्त्रकिया करून व्याधीग्राम रूग्णांना आराम देण्याचा प्रयत्न केला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री मा.शिवराज प.(पाटील) चाकूरकरांच्या मुलीने उदगीर येथे लाईफ केअर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर सुरू करण्याचे काम केले. लातुर जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागातील या दावाखाण्याचा परिसरातील लोकांनी उपयोग घेता यावा या करीता सुरू केले. तसेच आज परळी येथील डॉक्टरांच्या सहकार्याने महाआरोग्य शिबीर सुरू केले असून चाकुरकर परिवाराच्या वतीने हा उपक्रम कौतुकास पद आहे.
म्हणून विविध रूग्णांना व्याधीग्राम रूग्णांची तसेच आरोग्याची तपासणी सुरू करण्यात व त्यांच्यावर औषध उपचार करून शस्त्रक्रिया येत आहे.
असे लाईफ केअर हॉस्टिपल अॅण्ड रिसर्च सेंटर च्यावतीने असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या मोफत तपासणीमध्ये हडांचा ठिसूळपणा मोजने यासाठी 500 रूग्णांची व दमा तपासणी 500 रूग्णांची तसेच वेगवेगळया रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबीरात मरणोत्तर नेत्रदान सोहळा रूग्णांनी करण्यात आले. तसेच अवयव दान करून देहदान नोंदणी अभियानात 5 रूग्णांनी आपली नोंदणी केलेली आहे. असे अभियाना कर्त्याने सांगितले.आज डॉ.नरेंद्रकुमार बालुरे, डॉ.प्रमोद भागे, डॉ.रामराव कांबळे, डॉ. शेख बशीर भहू संख्ये डॉक्टरांनी श्रावणमास पवित्र कार्याचा उपयोग रूग्णांना सागून तसेच त्यांना सहकार्य केले. हा उपक्रम परळी शहरातील असंख्य रूग्णांनी घेतला.वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडे असलेले सभागृह मोठठ्याप्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या नव्या बाधलेल्या सभागृहात रूग्णांची तपासणी करण्यात आली.
या प्रशस्त जागे बद्दल अध्यक्ष डॉ.सौ.अर्चनाताई पाटील यांनी देवस्थान सचिव राजेश देशमुख यांचे आभार मानले.
