परळी (प्रतिनिधी): येथील कामगार कल्याण केंद्राचे केंद्र संचालक आरेफ शेख यांचा महावितरण कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष सत्कार करण्यात आले. महावितरण मधील कामगारांच्या पाल्यांना कामगार कल्याण केंद्राच्या शिष्यवृत्ती योजना, पाठ्यपुस्तक सहाय्य योजना, एम. एस. सी. आयटी अनुदान योजना आणी विविध उपक्रम व कार्यक्रमाचा लाभ श्री. शेख यांनी मिळवून दिला. यानिमित्त महावितरणचे अभियंता विजयकुमार वरवटकर यांनी
शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री. शेख यांचा सत्कार केला. यावेळेस प्रसाद कुलकर्णी, उमा ताटे, भगवान मंडलीक, प्रकाश परळीकर उपस्थित होते.
