रामपुरी बु. मानवत तालुक्यातील गोदावरी तीरावर वसलेले सुमारे साडे चार हजार लोकसंख्येचे गाव.. काळी जमीन, ऊस ,केळी, सोयाबीन, कापूस यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत सधन म्हणून सुपरिचित असलेले गाव ....परंतु वीस वर्षापूर्वी शिक्षण क्षेत्रापासून दूर असलेलं गाव आज शिक्षण क्षेत्रात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावलौकीक निर्माण होईल अशा दर्जाचं काम करीत आहे. स्वतःला विकसित करून समृद्ध बनायचं असेल तर "शिक्षणाशिवाय पर्याय नाही " या विचाराने प्रेरित होऊन रामपुरी गावची विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत.
रामपुरी गावातून 2002 पासून आजपावेतो
-----------------------
23 डॉक्टर KEM मुंबई, JJ मुंबई, GMC
27 इंजिनीअर IIT पवई पासून NIT नागपूर पर्यंत,
5 क्लास वन अधिकारी DDR, DyCEO,ACST
7 Ph.D करून प्राध्यापक
सैन्य दलात 4 जण
5 बँक मॅनेजर,
3 PSI,
7 MBA ,
12 जण पोलीस गडचिरोली पासून मुंबईपर्यंत
50 हुन अधिक शिक्षक, 25 हुन अधिक वकील,
तसेच न्यायाधीश, लेफ्टनंट व इतर पदावर 50 हुन अधिक
अश्या विविध उच्च पदावर रामपुरी चे सुपुत्र /सुपुत्री कार्यरत आहेत.
जनजागृती झाल्याविन! न मिटे समाजाचे दैन !! या उक्तीप्रमाणे रामपुरीत जनजागृती व्हावी व लोकसहभागातून गाव निर्माण व्हावे तसेच ज्या विद्यार्थी शेतकरी व नागरिकांनी शिक्षण, शेती व सेवा क्षेत्रात उत्कृष्ट काम करून रामपुरी चे नाव उंचावले आहे त्यांचा गावाकडून नागरी सन्मान व्हावा म्हणून बळीराजा महोत्सव व रामपुरी भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत,आजी- माजी कर्मचारी अधिकारी संघ व सर्व ग्रामस्थ रामपुरी यांच्या संयुक्तविद्यमाने मागील वर्षी पासून करण्यात येते.
मागील वर्षी भास्करराव पेरे पाटील सरपंच आदर्शगाव पाटोदा, कृषिभूषण कांतराव काका झरीकर, विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारी यांनी विविध विषयावर जनजागृतीपर प्रबोधन केले.
हीच परंपरा कायम ठेवत या वर्षी श्री.चंदू पाटील मारकवार सरपंच आदर्शगाव राजगड जिल्हा चंद्रपूर, शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्ती श्री. नितीन लोहट, श्री.विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी व श्री.संजय ससाणे गट शिक्षण अधिकारी यांनी ग्रामविकास,ग्रामस्वच्छता ई विषयावर मार्गदर्शन केले. सरपंच श्री शैलेश यादव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ओमप्रकाश यादव उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लोक प्रबोधनाचे महत्त्व विशद केले. आभार प्रदर्शन अॅड. विलास राऊत यांनी केले. कार्यक्रमास गावातील नागरिक व पंचक्रोशीतील नागरिक हजारोचे संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वायकोस व संयोजन बाळासाहेब यादव, माधव यादव इतर तरुणांनी व गावकरी मंडळींने केले.
"आपण समाजाचं देणं लागतो" या भावनेने प्रेरित होऊन रामपूरी येथील तरुण मंडळी फार मोठ्या प्रमाणात उत्साहाने समाज कार्यात सहभागी होत असून वृक्षवल्ली फाउंडेशन, राजश्री शाहू महाराज वाचनालय व बळीराजा महोत्सव याच्या माध्यमातून काम करीत आहेत. वृक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन मागील वर्षी सर्व रामपुरीकरांनी एकत्र येऊन वृक्षवल्ली फौंडेशन तयार केली आहे. मागील वर्षी शेकडो झाडे लावली व ती आज रामपुरीचे आकर्षण ठरत आहेत.
अधिकारी -डॉक्टरांची रामपुरी व शिक्षणाची पंढरी म्हणून जिल्ह्यात नावलौकिक कमावला असून रामपुरी पुढील काही वर्षात आदर्श गाव म्हणून सुद्धा उदयास येईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. सर्व गावकरी बांधव, तरुण मित्रमंडळी यांनी अतिशय उत्साहाने सर्व कार्यामध्ये सहभाग नोंदवला याचा सार्थ अभिमान आहे व हाच उत्साह टिकून राहील अशी खात्री देखील आहे.
#माझं गाव..माझं तीर्थ समजून प्रत्येक नागरीकांनी गावासाठी श्रमदान, लोकसहभाग दिला तर गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास होईल. -ओमप्रकाश मं.यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. चंद्रपूर.
