Friday, November 30, 2018

ना.धनंजय मुंडे यांच्या आग्रही भूमिकेने मराठा बांधवांना न्याय - बाजीराव धर्माधिकारी




मराठा आरक्षणाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वागत
परळी वैजनाथ ।प्रतिनिधी
         आज मराठा बांधवांना 16% आरक्षण घोषीत झाले. मोठ्या संघर्षापुढे सरकार झुकले असले तरी या आंदोलनात ज्या बांधवांनी हौतात्म्य  दिले त्यांच्याप्रती सहवेदना आहे. मराठा आरक्षणाचे रा. काॅ. च्या  वतीने स्वागत आहे. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे  यांनी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला. विधिमंडळात 22 वेळेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला वेठीस धरले. त्यांच्या भूमिकेचे मराठा बांधवांना न्याय मिळण्यासाठी मोठे योगदान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.
          हिवाळी अधिवेशनात ना. धनंजय मुंडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाला जेरीस आणले.मराठा आरक्षणा बाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पटलावर ठेवण्यास विरोधी पक्षांनी आग्रही भूमिका मांडली. गेल्या २२ वर्षांपूर्वी  बीड जिल्हा परिषदेचेउपाध्यक्ष असताना प्रथम मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि हा मुद्दा आजतागायत लावून धरला. गेल्या चार वर्षात शेतकरी कर्जमाफी, मराठा-लिंगायत-धनगर-मुस्लिम आरक्षणाबाबत सातत्याने मुद्दे लावून धरलले आहेत हे सर्वज्ञात आहे.  
      जनांदोलन, मराठा समाजबांधवांचे  हौतात्म्य, विरोधी पक्षांचा रेटा या सर्व बाबी महत्त्वपूर्ण असुन शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळाले व न्याय मिळाला. या आरक्षणाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर स्वागत करत असून या न्याय लढाईत महत्वपूर्ण भुमिका बजावून मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याबद्दल विधिमंडळ नेते आ. अजितदादा पवार,  ना. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व शिर्षस्थ नेत्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस यांनी म्हटले आहे.
       दरम्यान या आंदोलनात हौतात्म्य दिलेल्या मराठा समाजातील बांधवांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ अर्थिक मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.