Monday, December 3, 2018

जिजामाता उद्यान फूडप्लाझा प्रकल्प पूर्णत्वाकडे..!


महाराष्ट्र राज्याचे विधान परीषद विरोधी पक्षनेते ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या नगराध्यक्षीय कारकिर्दीमध्ये संकल्पीत झालेला नगर परीषद परळी वैजनाथ द्वारा मराठवाड्यातील पहिला नगर पालिकेचा "फूड मॉल" जिजामाता उद्यान येथे 32 दुकानांचा "जिजामाता उद्यान फुड प्लाझा" निर्मित झाला असून प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे.प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तसेच परळी आणी परीसरातील नागरीकांना धूळमूक्त आणी हायजीनिक वातावरणात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
सदर फूडप्लाझा मध्ये शहरातील सुप्रसिद्ध भेळ,पावभाजी,आईस्क्रीम पार्लर सोबतच महाराष्ट्रातील नामांकित फूडचैन या ठिकाणी असणार आहेत.फूडप्लाझा मध्ये आर ओ ट्रीटमेंट चे शुद्ध पाणी,सुसज्ज लाईट,मुबलक पर्किंग,स्वच्छता कर्मचारी,स्त्री पुरुष अद्यायवत स्वतंत्र टॉयलेट,24 तास वॉचमैन, सी सी टी व्ही सर्विलंस,बैंक ATM आदिसह सज्ज असणार असून या प्रकल्पाचे प्रगतीपथावर काम आहे.सदर प्रकल्पाचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता आर.एच.बेंडले यांच्या मार्गदर्शनाखाली सल्लगार अभियंता म्हणून लातूर येथील चिन्मय कन्सट्रक्शन चे ईं. अपूर्व शाबादे काम बघत आहेत.