Monday, November 12, 2018

शारीरिक व मानसिक सुदृढता ही काळाची गरज-सुरेश टाक



परळी वै. प्रतिनिधी
येथील दयानंद व्यायाम शाळा, आर्यसमाज परळी च्या वतीने विद्यार्थ्यांना ची शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने व्यायाम संस्काराचे 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणाऱ्या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी अध्यक्ष म्हणून परळी शहरातील आदर्श व्यक्तिमत्व सुरेश भाऊ टाक व उद्घाटक म्हणून क्रीडा क्षेत्रातील आदर्श मार्गदर्शक श्री सुभाष नानेकर गुरुजी हे होते. यावेळी अध्यक्षस्थान भूषविलेले सुरेश भाऊ टाक या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत मानसिक व शारीरिक दृष्ट्या आपल्या स्वतःचा विकास करण्यावर भर द्यावा व मानसिकते सोबत शरीराचा देखील विकास करावा. यावेळी उद्घाटक म्हणून लाभलेले नानेकर सर यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना विद्यार्थ्यांवर आधारित व त्यांच्या मानसिक व शारीरिक दृष्ट्या कशा पद्धतीने विकास करावा हे स्फूर्ती गीताद्वारे  सांगत विद्यार्थ्यांना एक सुंदर असे गीत ऐकवले भारत सिंह काहा हो हे आर्यवीर गण आहो या गीताने विद्यार्थी रूम हर्षून गेली अशा स्फूर्तीने गिता व्दारे दयानंद व्यायाम शाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिबिराची प्रस्तावना क्रीडाशिक्षक विलास आरगडे सर यांनी अतिशय उत्तम रित्या मांडली  व सूत्रसंचालन प्रा. अतुल दुबे सर तसेच आभार प्रदर्शन प्रा.डॉ. जगदीश कावरे सर यांनी मानले. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी महर्षी दयानंद सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ फोडून सुरूवात करण्यात आली यावेळी शिबिरातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते व मान्यवरांन मध्ये आर्य समाज परळी चे माजी कोषाध्यक्ष प्रभुलाल गोहिल,गोवर्धन चाटे, भाऊटानकर सर, वसंतराव सूर्यवंशी तसेच विजय मुंडे सर, अनकाडे सर, कराड सर, अमित कचरे सर या कार्यक्रमास यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खालील सह शिक्षकांनी परिश्रम घेतले राहुल तिडके,अजय राऊत, दिगंबर नागराळे, मयूर नागापुरे शुभम गर्जे,विक्रम स्वामी,शिवदीप स्वामी,जगन्नाथ रामदासी,धनराज पवार,अवधूत अयाचीत,राहुल नाईकवाडे,विजय मोगरकर सुदर्शन लिखे,रोहन कंटीकूरे, नवनाथ सांगळे,विवेक आघाव या सर्वांनी यशस्वीपणे पार पाडली