परळी वै.
मुबंई येथे महाराष्ट्र वकील परिषदेचे तथा सुप्रसिद्ध वकील ऍड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी परळी वैजनाथ येथील वकील संघाने निषेध करून हल्लेखोरांस कठोर शासन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केल्याचा कारणावरून अँड.गुणवंत सदावर्ते यांच्यावर न्यायालयाच्या परिसरात हल्ला करण्यात आला होता.सदरचा हल्ला हा न्यायव्यवस्थेवर असल्याने याबाबत हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. याबाबतीत परळी वकील संघाच्या वतीने ठराव घेऊन येथील उपविभागीय अधिकारी श्री. गणेश महाडिक यांना निवेदश दिले.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष श्री. पी.एम.सातभाई जेष्ठ विधीज्ञ.अँड.हरीभाऊ गुट्टे अँड.डि.एल.उजगरे.अँड. वंसतराव फड.अँड. आर.व्ही.गित्ते. अँड.परमेश्वर गित्ते अँड.अँड.संजय रोडे.अँड.प्रदिप गिराम.अँड.अँड लक्षमण अघाव अँड.प्रल्हाद फड.अँड. धनजंय कांबळे अँड.केशव अघाव.ईत्यादी उपस्थित होते.विशेष म्हणजे परळी वकील संघाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या मागणीस जाहीर पाठिंबा दिला आहे.
