परळी (प्रतिनिधी):मराठा आरक्षण चळवळीतील लढवय्ये तथा राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून व सामाजिक जाणिवेतून मराठा समाजातील विध्यार्थी व युवकांसाठी आरक्षण लागू झाल्यामुळे खास मराठा जातीचे प्रमाणपत्रासाठी शिबीर आयोजित केले आहे.शैक्षणिक क्षेत्रात जात प्रमाणपत्राच्या आधारे विविध संधी व सवलती मिळणार आहेत. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी विध्यार्थी व युवकांची कार्यालयिन कामासाठी हेळसांड व विलंम्ब होऊ नये, शासनाची नौकर भरती व शैक्षणिक कामांकरीता जातीच्या प्रमाणपत्राची वेळेत पूर्तता व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मराठा जातीचे (SEBC) प्रमाणपत्र मोफत प्रस्ताव संकलन शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत जास्त मराठा बांधवानी आवश्यक त्या कागदपत्रासह शिबिरात सहभागी व्हावे असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरेश नानवटे यांनी केले आहे.