परळी वैजनाथ,(प्रतिनिधी):-देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.१२ ते २० डिसेंबर या कालावधीत मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीर आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा तमाम मराठा समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिनेश गजमल, न.प.चे स्वच्छता सभापती विजय भोयटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर प्रांगणात १२ ते २० डिसेंबर मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीर शिबीर ठेवण्यात आले आहे. या मध्ये मराठा समाज बांधवांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र (तलाठी) , जातीचा उल्लेख असलेला प्रवेश निर्गम उतारा, राष्ट्रीयत्वाचा उतारा, अर्जदाराचे आधार कार्ड, वडिलांचे आधार कार्ड, फोटो, रेशन कार्ड, लाईट बिल पासपोर्ट आकाराचे फोटो, आदी आवश्यक कागदपत्रा ची पूर्तता करून प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने मोफत तयार करून त्याचे संकलन करण्यात येनार आहे. प्रमाणपत्र मिळण्यासाठी हे प्रस्ताव संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सादर करण्यात येणार आहेत. अनेक वर्षांपासून उभारलेल्या चळवळीतून मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र लवकरात लवकर प्रत्येक मराठा समाजबांधवांना मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ ते २० डिसेंबर मराठा जात प्रमाणपत्र प्रस्ताव संकलन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराचा लाभ तमाम मराठा समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन दिनेश गजमल, न.प.चे स्वच्छता सभापती विजय भोयटे यांनी केले आहे.

