Sunday, January 20, 2019

26जानेवारीला शेतकऱ्याचा पुतळा बसवणार. ये सुनकर चबुतरा खुष हुवा...





(दिलेले आश्वासन पुर्ण केल्याबद्दल पत्रकार कदमनी ना.धनंजय मुंडेचे मानले आभार.)
(दिलेले आश्वासन पुर्ण करणारा नेता.ना.डि.पी.मुंडे.)
परळी वैजनाथ(प्रतिनिधी)शहरातील तहसिल कार्यालयाच्या आवारात छानसा शेतकऱ्याचा नविन पुतळा ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 26जानेवारी रोजी बसविला जाणार असुन पुतळा बसविण्याचे दिलेले आश्वासन विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी पुर्णकेल्या बद्दल त्यांचे शेतकऱ्याचा पुतळा बसवण्यासाठी वेळोवेळी आंदोलन,उपोषण करून सतत मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी आभार व्यक्त केले असुन शेतकऱ्याचा पुतळा बसवला जाणार या बातमीने चबुतरा खुष हुवा... योग दि 26जानेवारीला येत आहे.
या विषयीची इत्तभुत माहिती अशी की तहसिल कार्यालयाच्या आतील आवारात इमारतीचे बांधकामावेळी प्लाँस्टर आँफ पेरिसचा सुंदर असा नांगरधारी शेतकऱ्याचा पुतळा बसवला होता.कालांतराने वातावरणामुळे पुतळ्याचे हात व पायाचे प्लाँस्टर आँफ पेरिस गळुन पडल्याने पुतळा विद्रुप दिसु लागल्याने तहसिल प्रशासनाने सदरिल पुतळा काढून टाकला होता व नविन पुतळा बसवु असे लेखीआश्वासन दिले होते.
अनेक दिवस उलटुन गेले तरी प्रशासनाकडुन पुतळा पुतळा बसविण्याच्या काही हालचाली होत नसल्याने  पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी एकदा तहसिल कार्यालया समोर शेतकऱ्याची वेशभुषा करून आंदोलन केले होते तर तीन वेळेस उपोषण केले होते तर एकदा परळी ते बीड पायी जावुन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 26 जानेवारीरोजी बोंबमारो आंदोलन करून सेवानिवृत्त जिल्हाधिकारी मा.ससाणे साहेबांना मागणीचे निवेदन दिले  होते.येवढे करूनही पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे हे 15आँगष्टच्या झेडां वंदनास परळी तहसिल कार्यालयात आले असता झेडांवदन व राष्ट्रगित झाल्यावर शेतकऱ्याचा पुतळा बसवावा अश्या घोषणा देवुन देत आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधले होते
तेंव्हा ना.धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने सदर बळीराजाचा पुतळा बसविला जाईल असे आश्वासन पत्रकार प्रेमनाथ कदम यांना दिले होते ते दिलेले आश्वासन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षमहोदय खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त शहरात 12/12/2018ते 26/1/2019 या कालावधीत ठेवलेल्या विविध सामाजिक कार्यक्रमासह तहसिल कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्याचा नविन पुतळा बसवणार असे जाहिर केले होते त्याची पुर्तता 26जानेवारी पुर्ण होणार असुन पुतळा बसविण्याचे दिलेले आश्वासन पुर्ण केल्या बद्दल ना.धनंजय मुंडे नाथ प्रतिष्ठानचे सदस्य तसेच  राष्ट्रवादी काँग्रेचे सर्व बीड जिल्हापरिषद सदस्य,न.प.चे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, न.प.तील राष्ट्रवादीचे गटनेते तथा विविध विषय समितीचे सभापती,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष,पक्षाचे नगरसेवक व पक्षातील सर्व पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्व बळीराजा तर्फे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी जाहिर आभार मानले असुन सलग 9 वर्ष पुतळा बसवण्याची वाट बघत उभा असणारा, चबुतरा खुष हुवा ......असे हि बातमी ऐकुण आंनदी झालेला चबुतरा म्हणत  असेल.