Monday, January 21, 2019

बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचा परळी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) ः-
अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचा परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बालकिशन सोनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री देशमुख हे परळीत एका कार्यक्रमानिमित्त परळीत आले असता त्यांनी दैनिक न्याय टाईम्सच्या संपर्क कार्यालयास शनिवारी सकाळी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा परळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.न्याय टाईम्सचे संपादक बालकिशन सोनी यांच्या हस्ते श्री देशमुख यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी युवक काँगे्रसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संजय काळे यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास रामराजे देशमुख, धिरजप्रसाद अवस्थी, भास्कर आण्णासाहेब देशुमख, परळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष बालासाहेब फड, सेवा सोसायटी वानटाकळीचे चेअरमन नितीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.