परळी वैजनाथ (प्रेमनाथ कदम)परळी बस स्थानक व आगारातील विविध समस्या पुर्ण कराव्यात या साठी दि.22जानेवारी रोजी पत्रकारांच्या वतीने करण्यात येणारे उपोषण महाराष्ट्र परिवहन महामंडळाने मागण्या लवकर पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम व रानबा गायकवाड यांनी दिली आहे.
बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग,औष्णिक वीज निर्मिती केंद्र,रेल्वेमुळे प्रसिध्द बाजारपेठ,शैक्षणिक,सामाजिक व राजकिय क्षेत्रामुळे देश,विदेशात प्रसिध्द असणाऱ्या परळी शहरातील बस स्थानक व आगारात अनेक समस्या निर्माण झाल्या असुन ज्यात सर्वत्र पडलेले खड्डे,बस स्थानकाची झालेली दुरावस्था,प्रवाश्यानां पिण्यांच्या पाण्याची कमतरता,महिला कर्मचारी वर्गासाठी मुक्कामी राहण्यासाठी होणारी गैरसोय व ईतर अनेक प्रवाशी वर्गासाठी हिताचे प्रश्र येथे निर्माण झाले असुन हे प्रश्र सोडवावे अशी मागणी अनेक वेळा नागरिक व प्रवाशांनी केली होती तसेच या प्रश्रावर दि.25/1/2017ला परळीतील पत्रकारांनी उपोषण सुध्दा केले होते तेव्हां
लवकरच हे प्रश्र सोडवले जातील असे आश्वासन म.प.म.दिले होते.सदर दिलेल्या आश्वासनाला दोन वर्ष झाले तरी मागणी पुर्ण न केल्या मुळे दि.22/1/2019ला याच मागणीसाठी उपोषण करणार असे निवेदन परळीतील पत्रकारांनी परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांना पाठवले होते त्याची दखल मंत्री महोदयांनी घेवुन लवकरच परळीतील बस स्थानकाची अत्याधुनिक वास्तु तसेच सर्व रस्त्यांचे सिंमेट कांक्रिटी करण व ईतर सुविधासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असुन फंड मंजुर होताच कामे पुर्ण करू व आपण उपोषणाचा मार्ग न अवलंबता महामंडळास सहकार्य करावे असे लेखी पत्र दिल्या मुळे दि.22/1/2019रोजी लावण्यात येणारे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार प्रेमनाथ कदम, रानबा गायकवाड,शेख मुकरम,महादू गिते,माणिक कोकाटे व बाबा शेख यांनी दिली आहे.परळी वैजनाथ (प्रेमनाथ कदम)परळी बस स्थानक व आगारातील विविध समस्या पुर्ण कराव्यात या साठी दि.22जानेवारी रोजी पत्रकारांच्या वतीने करण्यात येणारे उपोषण महाराष्ट्र परिवहन महामंडळाने मागण्या लवकर पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम व रानबा गायकवाड यांनी दिली आहे.
बाराव्या ज्योतिर्लिंगापैकी पाचवे प्रभु वैद्यनाथाचे ज्योतिर्लिंग,औष्णिक वीज निर्मिती केंद्र,रेल्वेमुळे प्रसिध्द बाजारपेठ,शैक्षणिक,सामाजिक व राजकिय क्षेत्रामुळे देश,विदेशात प्रसिध्द असणाऱ्या परळी शहरातील बस स्थानक व आगारात अनेक समस्या निर्माण झाल्या असुन ज्यात सर्वत्र पडलेले खड्डे,बस स्थानकाची झालेली दुरावस्था,प्रवाश्यानां पिण्यांच्या पाण्याची कमतरता,महिला कर्मचारी वर्गासाठी मुक्कामी राहण्यासाठी होणारी गैरसोय व ईतर अनेक प्रवाशी वर्गासाठी हिताचे प्रश्र येथे निर्माण झाले असुन हे प्रश्र सोडवावे अशी मागणी अनेक वेळा नागरिक व प्रवाशांनी केली होती तसेच या प्रश्रावर दि.25/1/2017ला परळीतील पत्रकारांनी उपोषण सुध्दा केले होते तेव्हां
लवकरच हे प्रश्र सोडवले जातील असे आश्वासन म.प.म.दिले होते.सदर दिलेल्या आश्वासनाला दोन वर्ष झाले तरी मागणी पुर्ण न केल्या मुळे दि.22/1/2019ला याच मागणीसाठी उपोषण करणार असे निवेदन परळीतील पत्रकारांनी परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांना पाठवले होते त्याची दखल मंत्री महोदयांनी घेवुन लवकरच परळीतील बस स्थानकाची अत्याधुनिक वास्तु तसेच सर्व रस्त्यांचे सिंमेट कांक्रिटी करण व ईतर सुविधासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला असुन फंड मंजुर होताच कामे पुर्ण करू व आपण उपोषणाचा मार्ग न अवलंबता महामंडळास सहकार्य करावे असे लेखी पत्र दिल्या मुळे दि.22/1/2019रोजी लावण्यात येणारे उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती पत्रकार प्रेमनाथ कदम, रानबा गायकवाड,शेख मुकरम,महादू गिते,माणिक कोकाटे व बाबा शेख यांनी दिली आहे.