Saturday, January 19, 2019

बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत दि.20 रोजी परळीत होणार 6 वी बौद्ध धम्म परिषद



बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत दि.20 रोजी परळीत होणार 6 वी बौद्ध धम्म परिषद
परळी(प्रतिनिधी)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रविवार दिनांक 20 जानेवारी रोजी सहावी बुद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत तर चैत्यभूमी मुंबई येथील भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभेचे पुज्य भंते दिपंकर हे धम्मदेसना देण्यासाठी उपस्थित राहणार असुन
या धम्म परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल तालुका परळी जिल्हा बीड च्या वतीने करण्यात आले आहे.यापरिषादेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय महासचिव आयोग जगदीश जी गवई, राष्ट्रीय सचिव आयु बी.एच. गायकवाड,ॲड.एस.एस. वानखेडे, महाराष्ट्राचे अध्यक्ष यु.जीबोराडे हे प्रमुख वक्ते असणार असुन सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर परिषदेचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे परळी तालुका अध्यक्ष जे.के कांबळे ,स्वागताध्यक्ष म्हणुन भारतीय बौद्ध महासंघाचे परळी शहर अध्यक्ष निलेश नारायण व्हावळे, भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार उपाध्यक्ष नामदेव दशरथ मुंडे,सुञसंचलन हनुमंत वाघमारे, योगेश मुंडे, आनंद तूपसमुद्रे, प्रेम सरवदे हे करणार आहेत.परळीत होत असलेली सहाव्या बौद्ध धम्म परिषद तीन सत्रात होणार असून पहिल्या सञात सकाळी 9 वाजता भारतीय बौद्ध महासभा संपर्क कार्यालय ईतके कॉर्नर मस्के कॉम्प्लेक्स परळी येथे धम्म ध्वजारोहन,9-30वाजता आयु भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणी 10वाजता रेल्वे परिसरात असलेल्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते धम्मपरिषद सभामंडप तोतला मैदान पर्यंत धम्मरॕलीचे आयोजन असणार आहे.तर दुसऱ्या सञात 11-30ते दुपारी 12-30 पर्यंत श्रामणेर संघ भोजन व सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना भोजनदानाचा कार्यक्रम होईल.तर तिसऱ्या सञाला दुपारी 2-30 वाजता धम्म परिषदेच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल असे परळी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतिने कळविण्यात आले आहे.