परळी वैजनाथ प्रतिनिधी
तळेगाव ता.परळी वैजनाथ येथील दोन युवकांना दारू सोडण्याचे औषध आहे असे सांगून कोणतेतरी पातळ द्रव्य पाजुन त्यांच्या म्रुत्युस कारणीभूत ठरलेल्या हदगाव जिल्हा नांदेड येथील एका डाँक्टरचा जामीन अर्ज नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
थोडक्यात व्रत असे की नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील आरोपी डाँ.रवींद्र फकिरा पाटील उर्फ पोद्दाडे यांच्याकडे दारु सोडण्यासाठी औषध घेण्यासाठी तळेगाव ता.परळी येथील संजय गिन्यानदेव मुंडे व विजय गिन्यानदेव मुंडे हे दिनांक 06.12. 2018 रोजी गेले होते.आरोपी डॉक्टर पाटील यांनी कोणतेतरी पातळ द्रव्य त्यांना पाजल्यानंतर उलट्या व यातना होऊन ते तडफुडुन मरण पावले वगैरे मजकुरावरुन मयताचे नातेवाईक विलास गोविंद मुंडे यांनी हदगाव पोलिस स्टेशनला आरोपी डाँ.रवींद्र पाटील याच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून गु रं न. 223/2018 गुन्हा कलम 304 भा.दं.वि अन्वये गुन्हा दाखल झाला होता.गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. गायके यांनी करून आरोपी डाँ.रवींद्र पाटील याला अटक केली होती. त्यामुळे आरोपीने नांदेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.फिर्यादी व सरकारी वकीलांनी आरोपी डॉ. पाटील यास जामीन देण्यास जोरदार विरोध करत डाँक्टराच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देऊन अशा प्रकारची वैद्यकीय प्रँक्टीस करण्यास इलेक्ट्रोपँथी व होमिओपॅथी डाँक्टराना बंदी घातल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच वैद्यकीय प्रथ्युकरण अहवालमध्ये आरोपी छेडछाड करण्याची व पुन्हा तोच व्यवसाय करण्याची व अन्य लोकांच्या म्रुत्युस कारणीभूत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही वगैरे बाजू मांडली.सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी डाँक्टरचा जामीन अर्ज फेटाळून लावला.शासनातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील व फिर्यादीतर्फे अँड.आर.व्ही.गित्ते यांनी त्यांना सहाय्य केले.
