परळी वै.: प्रतिनिधी - बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बीड येथे रविवार,दि.13 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. याबैठकीत मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे ईच्छुक आहेत. त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांचेकडे देण्यात आला. बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघातील ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संचालक बाबुराव मुंडे यांना उमेदवारी देण्याबाबतचे संकेत याबैठकीत एकमुखी चर्चा होऊन बाबुराव मुंडे यांनाच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता. यावेळी पक्षनिरीक्षक सत्संग मुंडे, नारायणराव मुंडे, प्रा.विजय मुंडे, सरचिटणीस अँड.विष्णू सोळंके , लहुदास तांदळे व यावेळी निवड मंडळाचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बीड येथे आज रविवार,दि.13 जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून बीड लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांशी यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच इच्छुक उमेदवारांची नांवे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीस दिली जाणार आहेत. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांना आज झालेल्या बैठकीत जवळजवळ उमेदवारी मिळणार असलेल्याचे संकेत मिळाले आहेत. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, मोदी सरकारच्या कालावधी मध्ये बेकरी, पेट्रोल डिझेल, गँस यांची प्रचंड महागाई, जिएसटी मुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेकिन इंडिया ही योजना फस्वी व दिशाभूल करणारी योजना, प्रत्येक खात्यावर 15 हजार रूपये येणार होते. अशा अनेक विविध खोट्या योजना जाहीर केल्या आहेत. अशा दिशाभूल सरकारला नागरिक खाली उतरल्याशिवाय राहणार नाहीत. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या राज्यामध्ये परिवर्तन झाले तेच या देशामध्ये होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेस पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. असे मत आपल्या मनोगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे यांनी मांडले.
