परळी वै.: प्रतिनिधी - येथील महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे परळी तालुकाध्यक्ष पै.मुरलीधर मुंडे यांना नुकताच महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परभणीच्या वतीने राज्यस्तरीय नागरी "क्रीडारत्न" पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल आज दि.13 जानेवारी रोजी दिंद्रुड येथे आय.टी आय.चे वर्ग मित्र मंडळींनी फेटाबांधुन, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील, जयहिंद प्रतिष्ठानचे, श्री संत भगवान बाबा व्यायाम शाळेचे संस्थापक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा श्री.तुळजाभवानी दुध संकलन केंद्राचे संस्थापक पैहलवान मुरलीधर भागवतराव मुंडे यांनी व्यायाम शाळेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून तसेच क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या कुस्ती व क्रीडा क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. सामाजीक, दुग्धव्यवसाय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने यावर्षीचा सन 2018 साठीचा राज्यस्तरीय नागरी "क्रीडारत्न" पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता. मुंडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वर्ग मित्र मंडळीच्या वतीने दिंद्रुड येथे झालेल्या कार्यक्रमात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ घालून सत्कार करण्यात आला. यावेळी राजेश पाळवदे, रामकिशन मुंडे, अमोल क्षीरसागर, विकास गोंदगे, अभिजित कसबे, भरत सुरवसे, शिवशंकर गिरी, संजय राठोड, कल्याण सुरवसे, बालासाहेब व्हावळे, श्रीहरी आघाव, चंद्रकांत केंद्रे, नरसिंग चाटे, घुगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रामचंद्र निरडे यांनी केले होते.
