Friday, March 15, 2019

जि.प. प्राथमिक शाळा दौनापूर येथे स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौनापूर तालुका परळी येथे स्वयंशासन दिन व निरोप समारंभ उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौनापूर केंद्र कन्या नागपूर येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला सातवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून उत्कृष्ट अध्यापन केले याप्रसंगी आपल्या तालुक्याचे लाडके गट शिक्षण अधिकारी माननीय गिरी साहेब उपस्थित होते मुख्याध्यापिका म्हणून कुमारी उत्कर्ष व उपमुख्याध्यापक म्हणून चिरंजीव रत्नेश्वर सोमासे उत्कृष्ट शालेय व्यवस्थापन केले त्यानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर घुले सर राठोड सर मोरे सर कुलकर्णी सर भोसले सर धाक पाडे सर   श्रीमती अल्झेंडे मॅडम श्रीमती राठोड मॅडम यांनी परिश्रम घेतले