परळी : महाशिवरात्री यात्रेनिमित्त पंचायत समिती, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशु, अश्व व श्वान प्रदर्शनाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, दुष्काळामुळे आलेली नैसर्गिक आपत्ती तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे खचुन न जाता धैर्याने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी जमलेल्या शेतकरी बांधवाना केले. तसेच महाशिवरात्री निमित्त होणारे पशु प्रदर्शन यापुढे भव्य प्रमाणात आयोजित करू असे यावेळी बोलताना ते म्हणाले. या प्रदर्शनात शासनाच्या विविध विभागाच्या माहीतीचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या प्रदर्शनात लाल कंधारी, देवणी व संकरीत जातीची जनावरे तसेच जातीवंत अश्व (घोडा) व श्वान (कुत्रा) यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
या प्रदर्शनात विजेते स्पर्धक अश्व चाल स्पर्धा मोठा गट अब्दुल वसीम अब्दुल सलीम- परभणी, धनु कटाळु काजी- बर्दापूर, माऊली संजीवन बिडगर- दाऊतपूर, अश्व चाल स्पर्धा लहान गट विष्णु महाराज कोळी-बेलकुंड, जाफर खॉन नूर खॉन-परभणी, गणेश दिपकनाना देशमुख- परळी, प्रदर्शन साहेबराव पुराजी चव्हाण- कौठळी, माऊली संजीवन बिडगर- दाऊतपूर, भरत रामकिसन सुरवसे-वंदन, पशु, अश्व व श्वान प्रदर्शनातील विजेते गट क्र.1 संकरित वासरे (जर्सी) 0 ते 1 वर्षातील प्रथम आकाश काशिनाथ मंदे कन्हेरवाडी, द्वितीय समाधान मधुकर बहिरे कन्हेरवाडी, तृतिय शुभम संजय बहिरे कन्हेरवाडी, गट क्र.2 संकरित गाय (जर्सी) प्रथम आकाश काशिनाथ मंदे कन्हेरवाडी, द्वितीय समाधान मधुकर बहिरे कन्हेरवाडी, तृतिय लक्ष्मण रामभाऊ कप्पे कन्हेरवाडी, गट क्र3 संकरित वासरे (एचएफ) 0 ते 1 वर्ष प्रथम मोहन गणपत मुकनर जोगलगाव, द्वितीय गंगाधर रामा साळुंके मोहगांव, दत्तराव गणपतराव मुकनर जोगलगाव, तृतिय रामा काशिनाथ दहशेरवार वंजारवाडा, सोमेश्वर बालासाहेब फड कन्हेरवाडी, गट क्र.4 संकरित गाय (एचएफ) प्रथम प्रदिप बामाजी फड नंदागौळ, द्वितीय शिवाजी संतराम गित्ते नंदागौळ, तृतिय बामाजी माणिक फड नंदागौळ, गट क्र.5 लाल कंधारी वळू प्रथम नारायण बापुराव मेनगर रिसनगाव, द्वितीय महेश्वर शिवलिंग धोंडे शिवणी, सुशिल माधव सापनर लिंबुटा, तृतिय माधव विश्वनाथ करडे धोडगा, परसराम नागनाथ सापनर लिंबुटा, गट क्र.6 लाल कंधारी गाय प्रथम दत्ता थोराजी सुरनर लिंबुटा, द्वितीय परसराम नागनाथ सापनर लिंबुटा, व्यंकटेश राम सुर्यकांबळे माळाकोळी, तृतिय वैजनाथ महादुराव सापनर लिंबुटा, परसराम नागनाथ सापनर लिंबुटा, गट क्र.7 लाल कंधारी वासरे प्रथम बामाजी महोदव सापनर लिंबुटा, संग्राम तुकाराम हळगरे सांगवी, द्वितीय धोंडिराम माधव सरडे धोडगा, व्यंकटेश राम सुर्यकांबळे माळाकोळी, तृतिय नामदेव बब्रुवान श्रीरामे लिंबुटा, वैजनाथ महादू सापनर लिंबुटा, गट क्र.8 देवणी वळू प्रथम तुकाराम पंढरी नरवटे कौडगांव, द्वितीय सत्यभामा केरबा शिंदे तळणी, माधव मलबा केसाळे वंजारवाडी, तृतिय संजय माणिक जाधव हसेगाववाडी, केरबा ज्ञानोबा शिंदे तळणी, गट क्र.9 देवणी गाय प्रथम दशरथ भुजंग पवार कुणकी, द्वितीय बालाजी यादव तिडके कुणकी, तृतिय कार्तिक भाऊसाहेब गायकवाड रेणापूर, दशरथ भुजंग पवार कुणकी, गट क्र.10 देवणी वासरे प्रथम रावसाहेब विठ्ठल फुगनर फुगनरवाडी, द्वितीय अमोल केरबा शिंदे तळणी, शिवदास यादव तिडके कुणकी, तृतिय बालाजी तुकाराम नरवटे कौडगांव, गट क्र.11 गिर गाय प्रथम राहुल वृक्षराज मुंडे तळेगाव, द्वितीय प्रदिप सुर्यभान मुंडे तळेगांव, तृतिय विष्ण्ाु सुर्यभान मुंडे तळेगाव इ. पशुपालकांनी/मालकांनी ज्या त्या गटांमध्ये पारितोषिके पटकावली. एकुण 3 लाख 17 हजार रुपयांची पारितोषिके या प्रदर्शनात वितरीत करण्यात आली.
या प्रदर्शनास माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, संदिप भैय्या क्षीरसागर, दत्ता पाटील, पं.स.सभापती कल्पनाताई सोळंके, आय्युबभाई पठाण, ऍड गोविंद फड, मधुकर आघाव, भैय्या धर्माधिकारी, लक्ष्मण तात्या पौळ, सुर्यभान नाना मुंडे, शरदभाऊ मुंडे, माणिकभाऊ फड, भाऊसाहेब नायबळ, जानेमियॉं कुरेशी, माऊली मुंडे, सटवाजी फड, सुदाम शिंदे, वसंतराव तिडके, विष्णुपंत देशमुख, दशरथ आबा मुंडे, अमर गित्ते, विशाल काकडे आदी उपस्थित होते.
तर विशाल देशमुख, नानेकर सर ऍड शशी चौधरी, डॉ.सुरेश चौधरी, साहेबराव चव्हाण यांनी घोड्याच्या पंचाची भूमिका निभावली व हे प्रदर्शन नीट पार पाडण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ.आर.आर.ठाकुर मॅडम व पशुधन विकास विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या प्रदर्शनाचे प्रस्ताविक पं.स. उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे यांनी केले तर आभार माऊली दादा गडदे यांनी मानले.
