परळी वै.: प्रतिनिधी
परळी येथील रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या प्लॅटफार्म क्रं.1 वर उंची वाढविण्याचे काम सुरू असुन सदर काम मात्र निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
परळी वै. हे शहर श्री वैजनाथ ज्योर्तिलिंगामुळे देशात प्रसिध्द असे शहर आहे. देशातील विविध राज्यातून भाविकभक्त पर्यटक श्री वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात. जास्तीतजास्त प्रमाणात ईतर राज्यातून येणारे भाविकभक्त रेल्वेनेच प्रवास करून परळी येथे येतात. भारत सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणासाठी व विविध कामांसाठी काम चांगले दर्जाचे व्हावे यासाठी कामाचा दरही चांगला देण्यात येतो. सध्या परळी रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म नं.1 वरील उंची वाढविण्याचे काम व विविध काम सुरू असुन कामाचा दर्जा चांगला करायचा सोडून संबंधीत गुत्तेदारामार्फत सदर काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याची चर्चा नागरिकांतून केले जात आहे. तसेच नवीन रेल्वेचे काम परळी ते सिरसाळा पर्यंत खोदकाम चालु असुन ते कामही चांगल्या दर्जाचे दिसत नसल्याचे बोलले जात आहे. केन्द्रामार्फत दिलेल्या दर्जाप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. परंतु निकृष्ट दर्जाचे काम करून गुत्तेदारामार्फत मलीदा लाटण्याचे काम चालु असल्याची चर्चा आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी असे बोलले जात आहे. याबाबत परळी पत्रकार संघ व संघाचे तालुका अध्यक्ष बालकिशन सोनी यांच्या वतीने रेल्वे प्रशासन परळी यांना निवेदन देण्यात आले आहे.
