Tuesday, April 30, 2019

परळी-लातूर-नंदागौळ-पुस-बर्दापुर मार्गे जाणारी बस सुरु करावी-सुरेश टाक


परळी वै. । प्रतिनिधी
परळीहुन लातुर, पुस, बर्दापुर मार्गे जाणारी बस प्रवाशांसाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक यांनी एका निवेदनाद्वारे बीड जिल्हा आगार प्रमुखांकडे केली आहे. परळी लातुर हे अंतर 60 कि.मी. असुन या मार्गामुळे प्रवासातही नागरिकांना कमी रक्कम आकारला या मार्गावरील प्रवाशांसाठी बस तात्काळ सुरू करण्यात यावी. जोपर्यंत परळी-अंबाजोगाई महामार्गावरील नादुरुस्त रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत परळी लातुर बस ही सुरू करण्यात यावी या बस सुरू केल्यामुळे प्रवाशांची सोय होवुन वेळेवर पोहचण्याचे काम होईल असेही निवेदनात नमुद करण्यात आले. परळी अंबाजोगाई महामार्गावरील विलंब होत असल्याने कामावरील प्रवाशांना अनेक सकटांना सामोरे जावे लागत आहे. तसेच एस.टी. चालकांना सुध्दा वाहन चालवितांना त्रास होत आहे.
दरम्यान रोज काम करुन आपली उपजीविका भागविणा-यांना तसेच विद्यार्थी यांना देखील सदर बस सुरु
केल्यास सोय होईल. या सर्व बाबींचा विचार करुन परळी लातूर पुस बर्दापुर मार्गावरील बसची सेवा आवश्यक आहे असे सुरेश टाक म्हणाले म्हणाले.