परळी (प्रतिनिधी)
कु.सिद्धीदात्री प्रविणकुमार तापडीया हि इयत्ता दहावीच्या सीबीएसई परिक्षेत भेल सेकंडरी शाळेतून 96.8 टक्के गुण घेवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. डॉ.प्रविण व डॉ.सौ.स्मिता तापडीया यांची सुकन्या कु.सिद्धीदात्री तापडीया दहावीच्या सीबीएसई परिक्षेत 96.8 टक्के गुण घेवून भेल सेकंडरी स्कुल येथून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
कु.सिद्धीदात्री तापडीया बेस्ट स्टुडंट म्हणून सुद्धा शाळेतून यापूर्वी निवडली गेली आहे. अभ्यासोबतच खेळातही विशेष सहभाग असून शाळेतील कब्बडी टीमसोबत 2018 च्या महाराष्ट्र राज्याच्या कब्बडी खेळात शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला होता. आयएमओ इंटरनॅशनल मॅथ ऑलीपॅडमध्येही तीने पहिली लेवल उत्तीर्ण केली आहे. शाळेतील सर्व स्पर्धा परिक्षातून विशेष गुणांसह ती पास झालेली आहे. शिक्षण व क्रिडा क्षेत्रातील सर्व गुण संपन्न अशी कु.सिद्धीदात्री हीची ओळख आहे.या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
