Wednesday, May 8, 2019

सर्वस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत आज ब्राह्मण सभेचा ४० वा सामुदायिक उपनयन सोहळा !



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)-
  ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४० वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज ९ मे रोजी होत आहे. या सोहळ्याला सर्वस्तरीय मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या शानदार सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 
    गेल्या ३९वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज आद्य शंकराचार्य जयंती गुरुवार  दिनांक ९ मे  २०१९ रोजी सकाळी १०.३५ वा.  हालगे गार्डन परळी वै. येथे संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.  या सोहळयात विविध ठिकाणच्या बटुंवर उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. या मध्ये आदित्य अभय लोणीकर परळी वैजनाथ, प्रसाद राजेंद्र जोशी, शैलेश राजेंद्र जोशी परळी वैजनाथ, धवल सुमीत देशपांडे पुणे, पृथ्वीराज चंद्रकांत कुलकर्णी खंडाळी, पियुष इश्वर कुलकर्णी आतनुर, राम विश्वंभर कुलकर्णी, राहुल विश्वंभर कुलकर्णी गुंज, मनोज ऋषीकेश कुलकर्णी उदगीर, योगेश श्रीराम पोखरकर मांडवा, प्रज्वल प्रभाकर कुलकर्णी अहमदपूर, गोविंद सुनील जोशी हैबतपुर, ऋषिकेश नंदकिशोर कुलकर्णी अहमदपूर, कार्तिक अमोल पांडे औरंगाबाद, अक्षय बालासाहेब टेकाळे सिरसाळा, रामानंद रविकिरण कुलकर्णी , अभिषेक रविकिरण कुलकर्णी  पांगरी, गोविंद मधुकर कुलकर्णी कोस्टगाव ता. रेणापूर, अनिकेत संतोष झामरे नांदेड, श्रेयस व्यंकटेश कुलकर्णी उजणी 
या बटुंवर उपनयन संस्कार करण्यात येणार आहेत. या सोहळ्यासाठी विविध ठिकाणचे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
         तरी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी.दा. सावरकर प्रबोधिनी, पेशवा युवा संघटन,ब्राह्मण महिला आघाडी,ब्राह्मण युवक संघटना, पुरोहित संघटना आदींनी केले आहे.