परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ...
उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या झळा व शहरात येणाऱ्या नागरीकांना सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही या परिस्थितीत परळीत स्वा. वि. दा. सावरकर पतसंस्थेच्या वतीने शुध्द व थंड पाण्याची पाणपोई सुरू केली आहे.या पाणपोईचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
परळीच्या मुख्य बाजारपेठेत मोंढा विभागात स्वा. वि. दा. सावरकर पतसंस्थेच्या कार्यालयाखाली शुध्द व थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भर उन्हाळ्यात लोकांची तहान थंड व शुध्द पाण्याने भागविण्याचे काम या सेवा उपक्रमातून होणार आहे.येणाऱ्या-जाणाऱ्यांना शुध्द व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने भर उन्हाळ्यात सर्वांनाच लाभ होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, नागरीक, व्यापारी, कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.
