जुगलकिशोर लोहिया.... परळीच्या विकासात खोडा घालायचा स्वभाव बदला !
]
परळी वैजनाथ । प्रतिनिधी. ....
परळीतील कोणत्याही विकासकामात खोडा घालायची सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांची आहे हे परळीकरांना माहीत आहे. सामान्य माणसाला सत्तेचा लाभ मिळवून देणे तर दुरच पण नगर परिषदेमार्फत होत असलेल्या कामांची आडवणूक करण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे असा घाणाघात करत घरकुल मंजुरीचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्या भाजप शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया आपण परळीच्या विकासात खोडा घालायचा स्वभाव बदला अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केली आहे. घरकुलाचे श्रेय काय घेता ? सत्तेत किंमत असेल तर घरकुल धारकांना वाळू मिळवून द्या अशी मागणीही बाजीराव धर्माधिकारी यांनी केली आहे.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत परळी शहरासाठी 1357 घरकुलांना मंजुर मिळाली असुन सहा महिन्यापुर्वी शहरात करण्यात आलेल्या सर्व्हे मधुन ही मंजुर मिळाली असुन यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या विशेष प्रयत्नाने या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे हे सर्वांना माहित असताना भाजपचे पत्रकबाज शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रसिद्धीपत्रक काढून केला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतीउत्तर देण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात नगर परिषद असल्याने सातत्याने भाजपच्या पालकमंत्री कामात आडवणूक करतात. परळीतील कोणत्याही विकासकामात खोडा घालायची सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांची आहे हे परळीकरांना माहीत आहे. जुगलकिशोर लोहिया शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात न्यायायलयात गेले, मोंढ्यात पाण्याची टाकी करण्याच्या विरोधात गेले यात न्यायालयाने नगर परिषदेच्या बाजूने निकाल दिला. अंबेवेस आणि गोपाल टॉकीज जवळील शॉपिंग कॉम्प्लेक्स होवू नये म्हणून तक्रारी अर्ज दाखल केले.प्रभु वैद्यनाथ पालखी मार्ग अतिशय सुंदर नियोजन नगर परिषद करीत असताना हेतूपुरस्सर रस्ते अनुदान योजनेचा निधी सार्वजनिक बांधकाम कडे वळवून आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना कडून निकृष्ठ दर्जाची कामे करीत आहेत.शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई असताना भाजपच्या किंवा व्यक्तिगत स्तरावर एकही पाणी टँकर नागरिकांना उपलब्ध करून दिले नाही उलट परळीकरांच्या हक्काचे पाणी नागापूर प्रकल्पातून 1 दलघमी नाहक विसर्ग केला जे की परळी शहराला अजून 6 महिने पुरले असते मात्र परळी शहरातील नागरिकांना त्रास होईल या पद्धतीने भाजपची नेतेमंडळी वागते.
भाजप शहराध्यक्षांना खरोखरच परळीचा ईतका पुळका असेल तर अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ महाविद्यालयात नौकर्यांसाठी सुशिक्षित बेरोजगारांकडून करोडो रुपये जमा केलेल्या पैशाचा उपयोग निदान सामान्य माणसासाठी करावा. वैद्यनाथ कॉलेज कडील न प ची लाखो रुपयांची थकबाकी भरून दुष्काळ निवरणास सहकार्य करावे. त्याचप्रमाणे घरकुलाचे श्रेय काय घेता ? सत्तेत किंमत असेल तर परळीतील घरकुल धारकांना साधी वाळू मिळवून देता येईल का? असे खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थित केले आहेत.
