Saturday, May 11, 2019

परळीचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी कायम स्वरुपी उपाययोजना कराव्यात जायकवाडीचे पाणी वाण धरणात सोडावे-फुलचंद कराड



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
परळी शहरासह तालुक्यात यावर्षी भिषण दुष्कळ जाणवत आहे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला असुन परळी शहरातील सर्वच भागात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. या पाणी टंचाईवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी नागापुरच्या वाण धरणात जायकवाडीचे पाणी सोडण्याची योजना मंजुर करावी यासाठी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे शिष्टमंडळासह मागणी करणार असल्याचे भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी सांगितले. 
परळी शहर व तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत पत्रकारांशी भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड  संवाद साधला मागील कांही वर्षात परळी तालुक्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. परळी शहरासह ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. आम्ही पंधरा वर्षापुर्वी जायकवाडी धरणातील पाणी कालव्याद्वारे वाण धरणात सोडण्यात यावे अशी मागणी केली होती. आज ती योजना कार्यान्वीत असतीतर परळीसह वीस गावांचा पाणी प्रश्‍न सुटला असता शासनाने कायम स्वरुपी पाणी पुरवठ्यासाठी या योजनेचा गांभीर्याने विचार करावा तसेच परळी तालुक्यात पशुधन मोठ्या संख्येने असुन या पशुधनाच्या चार्‍याची व्यवस्था करावी शेतकर्‍यांचा खरीप हंगाम तोंडावर आला असुन दुष्काळी परिस्थितीमुळे आगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना खरीपातील पेरणीसाठी मोफत बि-बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत परळी शहरातील पाणी प्रश्‍न तात्काळ व जलदगतीने सोडविण्यासाठी खडका येथील बंधार्‍यातुन पाणी पुरवठा करण्याच्या योजनेस मंजुरी द्यावे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना भगवानसेनेच्या शिष्टमंडळाद्वारे देण्यात येणार असल्याचे भगवानसेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी सांगितले.