बीड : नुकतेच मुख्यमंत्र्यांची बीडमध्ये सभा झाली होती. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, अनेक नेते येतील व जातील मात्र बीड जिल्हा हा काल ही गोपीनाथ मुंडे यांचा होता, आज ही आहे आणि पुढे ही राहील. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना फडणवीस यांची जीभ घसरली. मला अतिशय आनंद आहे की आमचे नेते गोपनीय मुंडे जी हे अचानक आम्हाला सोडून निघून गेले, असे वक्तव्य फडणवीस यांनी यावेळी केले.त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे फडणवीस यांची अडचण वाढू शकते, असे बोलले जात आहे.
फडणवीस यांच्या या विधानाने विरोधक आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच सोशल मिडियावर फडणवीस यांच्यावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर भाजप किंवा मुख्यमंत्र्यांकडून अजूनही या बाबतीत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या व्हिडिओमुळे बीडमधील राजकरणा तापण्याची शक्यता आहे.
