Wednesday, August 21, 2019

पिकविमा कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त आहे? धनंजय मुंडेचा गब्बर झालेल्या पिकविमा कंपन्यांवरून सरकारला टोला




जनसुराज्य यात्रेस किनवट मध्ये अभूतपूर्व स्वागत; विराट रॅली

नांदेड : एकी कडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत. जिथं सोयाबीन पिक लावले तिथं या पिकविमा कंपन्या सोयाबीनच पीकच विम्यातून वगळते. कापूस लावला तर कापूस वगळते. सरकार यावर काहीच बोलत नाही. पिकविमा कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त आहे? असा टोकदार सवाल करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली.
साडेतीन शक्तीपीठातील एक माहुर गडावरील रेणुका देवीचे दर्शन घेऊन आज शिवस्वराज्य यात्रेच्या तिसर्‍या दिवसाची सुरुवात करण्यात आली. नांदेड जिल्ह्यात ( सारकणी किनवट )येथे पारंपारिक वेशभुषेत, वाद्यांच्या तालमीत तिथल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे भव्य स्वागत केले. येथील सभेच्या ठिकाणी जाताना भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थानिक आमदार प्रदीप नाईक यांचा जननायक म्हणून गौरव केला. त्यांच्या मतदारसंघात ज्यापद्धतीने शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत झाले असे स्वागत कुठेच झाले नाही असे म्हणत, विरोधी पक्षात असताना देखील ५०० कोटी रुपये मतदारसंघासाठी आणलेल्या प्रदीप नाईक यांचे कौतुक केले.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या अपयशाचा पाढाही मुंडे यांनी वाचला. शेतकऱ्यांना असंख्य आश्वासने दिली. मात्र निवडणूक जिंकून आल्यानंतर हे शेतकऱ्यांना विसरले. मुख्यमंत्री जरी माझ्या शेतकऱ्यांना विसरले असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच विसरू शकत नाही. म्हणून आज आम्ही सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आवाज उठवत आहोत असा नारा त्यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत भाजप म्हणत होती मोदी है तो मुमकीन है. पण यांनी सगळा बट्ट्याबोळ केला. रोजगार नसल्याने तरुणांना कोण मुलगी देत नाही. आता विधानसभा निवडणुकीत हे म्हणतील फडणवीस है तो मुमकीन है तुम्ही यांच्या शब्दांना बळी पडू नका. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.
तिसऱ्या दिवशीही शिवस्वराज्य यात्रेला जनतेचा जागोजागी प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, माहुरचे आमदार प्रदीप नाईक, आमदार ख्वाजा बेग, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, डॉ. शैलेश मोहिते आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.