Friday, August 23, 2019

परळी तालुकास्तरीय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न



परळी-वै.(प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परळी वैजनाथ तालुकास्तरीय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न.

प्रती वर्षा प्रमाने याही वर्षी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने परळी वैजनाथ येथे श्री चिंतामणी फॉउंडेशन स्कूल परळी मध्ये तालुकास्तरीय १४,१७,व१९ वयोगटातील मुला/मुलींच्या खो खो स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटन करण्याकरिता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंतामणी फॉऊंडेशन स्कूलचे अध्यक्ष, श्री.विजयप्रकाशजी तोतला हे होते. तर उद्घाटक म्हणून परळी तालुका क्रिडा समन्वयक,श्री.अनकाडे सर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख श्री अतुलजी दुबे सर फॉउंडेशन स्कूलचे प्राचार्य.श्री रॉय सर,उपप्राचार्य.गजानन सर होते. या स्पर्धा चे आयोजन तसेच नियोजन व स्पर्धा यशस्वी करण्याकरिता फाउंडेशन स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री.श्रीधर जाधव सर,श्री.प्रा.डॉ.श्री.कावरे सर श्री.दिनेश गडदे सर तसेच सर्व कर्मचारी वृंद यांनी काम पाहिले. यावेळी परळी तालुक्यातील सर्व 19 शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी  होते. या स्पर्धेचे पंच म्हणून बाळासाहेब हंगरगे सर विलास आरगडे सर विजय मुंडे सर तसेच टाईम किपर म्हणून चाटे सर व स्कोरसिट लिहिण्याचे काम शेप सर यांनी पाहिले