परळी-वै.(प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परळी वैजनाथ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न.
प्रती वर्षा प्रमाने या ही वर्षी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने परळी वैजनाथ येथे आर्य समाज दयानंद व्यायाम शाळा मध्ये तालुकास्तरीय १४,१७,व१९ वयोगटातील मुला/मुलींच्या कुस्ती स्पर्धाचे आयोजन आर्य समाज येथील दयानंद व्यायाम शाळा या ठिकाणी करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेच्या सुरुवातीस बल देवता बजरंगबली व महर्षी दयानंद सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आर्य समाजचे प्रधान जुगलकिशोर लोहिया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद व्यायाम शाळेचे अध्यक्ष श्री. देविदासरावजी कावरे सर व जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव दत्ताप्पा ईटके गुरुजी,जयपाल लाहोटी,कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मुरलीधर मुंडे, तालुका संयोजक बी.व्हि.अनकाडे,शिवशंकर कराड हे होते. या स्पर्धेचे पंच म्हणून सुभाष नानेकर,प्रा.अतुल दुबे, प्रा.डॉ.जगदीश कावरे, गोविंद गित्ते, विजय मुंडे, संजय पापा देशमुख यांनी काम केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दयानंद व्यायाम शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले
