परळी : ( प्रतिनिधी ) :
भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथराव मुंडे यांच्याच नावाचा वापर करून राजकारणात उतरलेले धनंजय मुंडे हे तर 2023 पर्यंत आमदार आहेत . आमदारकी व विरोधी पक्ष नेते पद असतानाही विकासकन्या असलेल्या ना . पंकजाताई मुंडे यांना एवढा विरोध कोणासाठी ? असा परखड सवाल भाजपाचे नेते प्रा . टी . पी . मुडे , सर यांनी राष्ट्रवादी आघाडीचे धनंजय मुंडे यांना केला आहे .
भाजपा महायतीचे उमेदवार ना . पंकजाताई गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ काल बीडच्या खासदार डॉ . प्रितमताई गोपिनाथराव मंुडे , भाजपा नेते प्रा . टी . पी . मंडे सर यांनी हाळंब , हेळंब , जिरेवाडी , तडोळी , मांडेखेल येथे कार्नर सभा घेतल्या या सभेत बोलतांना खा. प्रितमताई यांनी महिला सक्षमीकरणाचे देशात उल्लखनीय कार्य करणा·या ना . पंकजाताई मुंडे यांना विजयी करा असे आवाहन केले . प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी परळी मतदार संघाच्या व बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी ना . पंकजाताई मुंडे यांचा विजय आवश्यक असल्याचे सांगतांना आपले मत उज्वल भवितव्यासाठी कमळाला द्या असे आवाहन केले .
राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार करतांना प्रा . टी . पी . मुंडे सर यांनी तुम्ही तर 2023 पर्यंत आमदार व विरोधी पक्ष नेते आहातच असे असतांनाही विकासकन्या ना . पंकजाताईच्या नेतृत्वाला एवढा प्रखर विरोध कशासाठी व कोणासाठी ? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित करून धनंजय मुंडे यांनी या प्रश्नाचे उत्तर मतदारांना द्यावे असे आव्हान ही त्यांनी दिले.
या कार्यक्रमाला जेष्ठ नेते बंकटराव कांदे , भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे , सरपंच विनायक गुट्टे, वौजनाथ मुंडे , भानुदास मुंडे , प्रभाकर मुंडे , सरपंच गोवर्धन कांदे , राहुल कांदे , रवि कांदे , सहदेव कांदे , गम्पु मुंडे , बालासाहेब मुंडे , पिंटु मुंडे , गोविंद मुंडे , विट्ठल मुंडे , भागवत मुंडे , सरंपच कोंडाबाई सिरसाट , वौजनाथ सातभाई , श्रीकिशन सातभाई , वाल्मिक सातभाई , अशोक सटाले , आनंत सातभाई , विष्णु सातभाई , अशोक सिरसाट , माणिकराव नागरगोजे माजी चेअरमन माणिकराव सलगर, धनगर समाजाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते संतराम गडदे, मुकुंद नागरगोजे , माधव नागरगोजे , काशिनाथ व्हावळे , शिवाजी मुंडे , काशिनाथ मुंडे , वौजनाथ मुंडे , गौतम मुंडे , राजन व्हावळे , अप्पाराव व्हावळे , रामधन घुगे , वाल्मीक नागरगोजे , बाबुराव नागरगोजे , देहु राठोड , जनार्धन राठोड , प्रा. दिनकर नागरगोजे , दामेधर घुगे , पोलीस पाटील शिवाजी नागरगोजे, भगवान नागरगोजे , महेश नागरगोजे, उध्दव नागरगोजे , विट्ठल मुंडे , भक्तराम फड , मारोती मुंडे , बालाजी गुट्टे , दयाराम फड , बालाजी दहिफळे , मधुकर दहिफळे , बाबु दहिफळे , संभाजी दहिफळे , पंढरी गित्ते , सरपंच मोहन होळंबे , बालाजी आंधळे , राम पाळवदे , सतिश होळंबे , राम होळंबे , बंडु होळंबे , माऊली आंधळे , गणपत आंधळे , ज्ञानोबा आंधळे , महादेव होळंबे , श्रीराम होळंबे , दत्ता पाळवदे आदीसह भाजपा शिवसेना, रिपाई महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक मोठ¶ासंख्येने सहभागी झाले होते.
