परळी : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत स्वत:चा पराभव दिसत असल्याने चिडलेल्या धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या बहिणीबद्दलच अतिशय खालच्या पातळीचे वकतव्य व विचित्र हावभाव करुन ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यानाच नव्हे तर संपुर्ण महिला वर्गाचा अवमान केला असल्याची संताप जनक प्रतिक्रिया भाजपाच्या युवा नेत्या सौ. जयश्रीताई गित्ते - मुंडे यांनी व्यक्त केली.
बहिण भावाचे नाते हे अतुट बंधनाचे प्रतिक असते परंतू राजकारणात स्वत:च्या स्वार्था साठी या नात्याला काळीमा फासणारा भाऊ आज दिसुन आला. विधानसभा निवडणूकीत होत असलेला पराभव सहन न झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी एका प्रचार सभे दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर टिका करुन विचित्र हावभाव केले त्यांच्या टिके वरुन त्याचे मानसिक संतुलन पुर्ण पने ढासळल्याचे दिसून येते.
स्वत:च्या रक्ताच्या नात्यातील बहिणी बद्दल अशी भाषा वापरणारा निर्लज भाऊ इतर सामान्य महिलांचा भाऊ कसा होईल ? भाऊ या नात्याने तो महिला वर्गाचे रक्षण कसा करील ? असा सवाल भाजपा नेत्या सौ. जयश्रीताई गित्ते - मुंडे यांनी उपस्थित करुन आता तरी अशा भामट¶ा पासून सावद राहा व महिलांच्या स्मानासाठी ना. पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहा तसेच महिलांचा अपमान करणा·या धनंजय मुंडे यांना मतदानातुन माध्यमातुन धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले.
