Sunday, December 4, 2022

उघड्यावर शौच करणे किती अस्वास्थ्यकारक?

 

 भारतात मोठमोठ्या देवालयापेक्षा शौचालयांची अत्याधिक आवश्‍यकता भासत आहे. आज भारतात कित्‍येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्‍यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेटमध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशासनाची टाळाटाळ तर कधी वित्‍तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्‍ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब ती कोणती असू शकेल? संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्‍वच्‍छतेचे महत्त्व पटवून देण्‍यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांगडावर शौचालय बांधले होते. महाराष्‍ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्‍मे महाराष्‍ट्रात घडून गेले आहेत. त्‍यापैकीच एक संतश्रेष्ठ गाडगेबाबा होते. स्‍वच्‍छतेचे महत्‍त्व सर्वप्रथम त्यांनी समाजाला पटवून दिले. त्‍यांनी स्‍वत: हातात झाडू घेऊन रस्‍त्‍यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांच्‍या डोक्‍यातील धूळ, घाण, कचरा साफ केले. ते खरे स्वच्छतादूत व स्वच्छतेचे पुजारी होते. बापू- श्रीकृष्णदास निरंकारीजींचा हा लेख जरूर वाचा... संपादक.    आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया नियोजित व अनियोजित क्षेत्रात काम करू लागल्या आहेत. मंदिरे, धार्मिक स्थळे, मार्केट, विविध वस्तू विक्रीचे रोड मार्केट, बाजार अगदी, रांगोळीपासून ते अनेकविध वस्तू विक्रीसाठी स्त्रिया घरापासून तास न् तास दूर राहतात. तेव्हा मलमूत्र विसर्जनाची गरज भागणार कशी? किती व कशी सोसायची ही हालअपेष्टा? ती मूलभूत गरजांपासून इतकी उपेक्षितच असू नये. निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांसाठी प्रसाधनगृह हेसुद्धा स्वच्छ भारत अभियानात आवर्जून समाविष्ट झाले पाहिजे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन आणि ते दाबून, कुचंबून ठेवणे, आरोग्यास किती हानीकारक? स्त्रियांचे आरोग्य व शारीरिक सुदृढता महत्त्वाची, तसेच मानसिक कुचंबणा टाळणे मोलाचे म्हणून स्त्रियांसाठी घरीदारी प्रसाधनगृहे हवीच आहेत. ती तशी सार्वत्रिक हवी. सार्वजनिक व कौटुंबिक स्तरावर प्रथम प्राधान्याने प्रसाधनगृहे उभारावीत. त्यातच शौचालय नसल्याने स्त्रियांच्या मासिक धर्माच्या काळात किती हाल होतात? ते विचारूच नका. म्हणे, आपण आता प्रगतशील अर्थव्यवस्थेच्या टप्प्यावर आहोत. प्रगत, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान, विकासाचे टप्पे पार करताना स्त्री प्रसाधनगृहाचा विषय इतका गंभीर असू नये, ही थोडी थोडकीच लज्जास्पद बाब असेल का?    विश्व मलमूत्र विसर्जन व्यवस्थापन दिन- जागतिक शौचालय दिन ही नैसर्गिक गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले जाते; पण ती उघड्यावर करण्याची क्रिया नसून त्यासाठी प्रसाधनगृह हवे, हे मान्य असूनही त्याबाबत प्रचंड अशी उपेक्षा व स्त्री प्रसाधन गृहाकडे तर नको तितके दुर्लक्ष होत आहे. शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले; मात्र माणसाच्या मलमूत्र विसर्जनासाठी बंदिस्त सोय असण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शरीर जीवनशैलीची ही अविभाज्य अशी प्रक्रिया होय. तो संवेदनशील असा विषय आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे सार्वजनिक अनारोग्याला, साथीच्या रोगांना निमंत्रणच जणू काही! हा दिन मलमूत्र विसर्जनाचे व्यवस्थापन व देशापुढील आरोग्याशी निगडीत आहे. त्याबद्दलची अनास्था, उपेक्षा आणि योग्य ती दखल घेण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष, अशी स्थिती आज आपल्या समाजात विशेषतः ग्रामीण निम्नशहरी भागात आहे, हे दुर्दैव होय. १९ नोव्हेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या दिवशी स्वच्छतेचे महत्त्व पटवून घ्यावे व द्यावे. नैसर्गिक गरज भागविली जावी, म्हणून या दिनाचे प्रयोजन करण्यात आले.      विश्व प्रसाधनगृह दिन हा आपल्याला आपल्या जीवनात स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याची आठवण करून देतो. आपल्या परिसरातील स्वच्छता व्यवस्था सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत आणि आपण त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जागतिक शौचालय दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्यांना अस्वच्छ सांडपाणी व्यवस्थेचे विविध धोके माहित नाहीत त्यांना सांगणे आवश्यक आहे. मानवी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यातून कोणतेही आजार होऊ नयेत. मानवी कचऱ्याचे कंपोस्ट खत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कचऱ्यामुळे अनेक गुंतागुंती निर्माण होतात. या दिवसांत ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांना शौचालये आणि स्नानगृहे बांधण्यासाठी मदत करण्याची गरज आहे. योग्य स्वच्छता व्यवस्थेशिवाय असे लाखो मार्ग आहेत, ज्याद्वारे रोग पसरू शकतात. जागतिक शौचालय दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे, की या रोगांवर कोणत्या मार्गांनी सामना केला जाऊ शकतो, यावर चर्चा करणे होय. भारतात मोठमोठ्या देवालयापेक्षा शौचालयांची अत्याधिक आवश्‍यकता भासत आहे. आज भारतात कित्‍येक स्त्री-पुरुषांना असुविधेमुळे उघड्यावर शौचास बसावे लागते. त्‍यामुळे रोगराई मोठ्या प्रणावर फैलावते. जेंडर बजेटमध्ये लाखोंची तरतूद होऊनही कधी प्रशासनाची टाळाटाळ तर कधी वित्‍तीय संकटामुळे लोक शौचालय बांधत नाहीत. ही महासत्‍ता होऊ पाहणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब ती कोणती असू शकेल? सुज्ञ पालकाने आपली लाडकी मुलगी संडास नसलेल्या घरी मुळीच देऊ नये. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून जाहीर केला आहे. जगभर या दिनी स्‍वच्‍छतेचे महत्त्व पटवून देण्‍यात येत आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांगडावर शौचालय बांधले होते. महाराष्‍ट्र संताची भूमी आहे. अनेक थोर महात्‍मे महाराष्‍ट्रात घडून गेले आहेत. त्‍यापैकीच एक संतश्रेष्ठ गाडगेबाबा होते. स्‍वच्‍छतेचे महत्‍त्व सर्वप्रथम त्यांनी समाजाला पटवून दिले. त्‍यांनी स्‍वत: हातात झाडू घेऊन रस्‍त्‍यावरची घाण साफ केली. रात्री किर्तनाच्‍या माध्‍यमातून लोकांच्‍या डोक्‍यातील धूळ, घाण, कचरा साफ केले. ते खरे स्वच्छतादूत व स्वच्छतेचे पुजारी होते.     निरोगी आरोग्याचा कानमंत्र म्हणजे स्वच्छ अशा बंदिस्त संडासमध्ये मलमूत्र विसर्जनाची व्यवस्था असणे होय. परंतु सुमारे ४० टक्के लोकांना शौचालयाची सुविधा नसणे वा त्याचा वापर न करणे अशी स्थिती आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशात ११० दशलक्ष शौचालयांची गरज आहे. ग्रामीण निम्नशहरी भाग, झोपडपट्टी, जुन्या वसाहती, डोंगर भागात वाड्या-वस्त्या वगैरेमध्ये शौचालयाची उपलब्धता नाही. उघड्यावर शौचास बसणे, हाच शिरस्ता आजतागायत चालू आहे. पाणंद, ओढा, नदी, टेकडी, झाडे-झुडपे वगैरेचा आधार घेत स्त्रिया मलमूत्र विसर्जन करतात. पुरुष समोर दिसला, की उभे राहणे हेच अपरिहार्य कर्म झाले आहे. स्त्रियांसाठी शौचालय नसणे, ही अत्यंत अन्यायकारक अनारोग्यी बाब होय. शहरी भागात कॉमन शौचालयाची व्यवस्था असते, तीही अपुरी व अस्वच्छच. त्यातच स्त्रियांच्या स्वभावानुसार त्या रांगेत उभे राहण्यास टाळाटाळ करतात. शिवाय सकाळी कामाची गडबड असते. मग ही नैसर्गिक गरज कुचंबून मारली जाते. त्यात आजारग्रस्त स्त्रिया, गरोदर माता, तरुण मुली यांची तर फारच गैरसोय होत आहे. ग्रामीण परिसरांमध्ये पारंपारिक मलनिस्सारण पद्धतीकरिता होणारी मोठी भांडवली गुंतवणूक, न परवडणारी देखभाल, व्यवस्थापन खर्च, पाण्याचा अपुरा पुरवठा, विखुरलेल्या वस्त्या व गावे आदींमुळे शक्य होत नाही. शहरी भागात प्रसाधनगृहे वाढत असूनही अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे, तेही विशेषतः स्त्रियांसाठी प्रसाधनगृह उभारणीमध्ये. व्यक्तिगत आरोग्य, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक आत्मसन्मान रक्षण व प्रगतिशील राष्ट्र म्हणवून घेण्याच्या या टप्प्यावर तर सर्वांसाठी प्रसाधनगृहे ही अत्यावश्यक गरज मानली जावी. स्त्री-पुरुष समानता, स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या, या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आदी या समानतेचा लढा देताना शासनावर दबाव टाकण्याचा म्हणूनच प्रयत्न करतात. त्यामध्ये वास्तविक स्त्री प्रसाधनगृहाची नितांत आवश्यकता, हा विषय प्रथम प्राधान्याने घ्यायला हवा. शिवाय जनजागृती, समाजप्रबोधन, कौटुंबिक समुपदेशन, स्त्रीपुरुष समानता विषयक कायदे आणण्याचा लढा देताना स्त्रियांचे मूळ दैनंदिन जीवन जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे मानून प्राधान्य द्यायला हवे. समानतेचा नारा देताना मुळातच स्त्री जीवन सुसह्य, सोसीक व सुखावह कसे होईल, हे पाहायला हवे. त्या दृष्टीने स्त्री प्रसाधनगृह हा प्रश्न मोलाचा आहे, याचे भान त्या चळवळीने व शासनानेसुद्धा ठेवावे, ही अपेक्षा!!! विश्व शौचालय दिनाच्या सर्वांना अनुवर्तनास्तव आठवडाभर हार्दिक शुभेच्छाजी !!  




लेखकः 

गोपाल बालकिशन सोनी 

परळी वैजनाथ ७०५७८८१७१७

Saturday, November 21, 2020

शिक्षकांची कोविड चाचणी झालेल्या शाळा पहिल्या टप्प्यात सुरू होणार



बीड दि.21 (प्रतिनिधी):-

राज्य शासनाच्या दि.10 नोव्हेबर 2020 च्या परिपत्रकानुसार दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 ते 12 चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बीड जिल्हयात इयत्ता 9 वी ते 12 वीच्या एकूण 768 शाळा असून 6600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत. ज्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कोविड-19 संदर्भातील आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली आहे, त्याच शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत. आजपर्यंत 2627 कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झालेली असून उर्वरित कर्मचार्‍यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे. चाचणी संबंधित काम दिनांक 24 नोव्हेबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित शाळा दुसर्‍या टप्प्यात दि.25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होतील.
  सर्व शाळांनी शासन परिपत्रक दि.10 नोव्हेबर 2020 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या शाळांतील कर्मचार्‍यांची तपासणी पूर्ण झाली आहे, त्या शाळांची यादी दि.22 नोव्हेंबर पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असेल, अशी माहिती बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारूक यांनी संयुक्तरित्या दिली.

Tuesday, September 8, 2020

ना.धनंजय मुंढे साहेबांच्या आदेशानुसार संतोष शिंदे यांनी गृह उद्द्योग व बचतगट ला भेट

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ना.धनंजय मुंढे साहेबांच्या आदेशानुसार महिला स्वतःचा उद्योग सुरु करावा म्हणून आग्रही असतात त्याच उद्देशातून  संतोष शिंदे तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस परळी यांनी वाडसावित्री नगर येथील गृह उद्द्योग आणि बचत गट ला भेट दिली आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ.सुलक्षणा वाघमारे मॅडम यांच्या पुढाकारातून वडसावित्री नगर भागात महिला गृहउद्योग बचत गटांच्या माध्यमातून कार्यालय सुरु करण्यात आले .बचत गटांना मार्गदर्शन करणे तसेच विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता बचत गटाचे कार्यालय मोलाची भूमिका निभावू शकते.कोरोनाच्या प्रदूर्भाव असल्याने सध्या मास्क हा आपल्याला अविभाज्य घटक झालेला असल्याने बचत गटांना मास्कचेही उत्पादन करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावेळी बचतगटाच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.

Tuesday, November 12, 2019

महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण


औरंगाबाद ः- महावितरणचा गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून याबाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.? या प्रकरणाची माहिती अशी की, बाबासाहेब बाबुराव हिवाळे (रा.पाटोदे वडगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथे राहत असून गट नं.35 मध्ये त्यांची शेत जमीन आहे. सदरील जमीनीतून इलेक्ट्रीकल टॉवर लाईन गेलेली असून त्याच टॉवरच्या लाईनच्या खालुन डी.पी.मध्ये येणारी विद्युत प्रवाह तार गेलेली आहे. त्या डिपीतून विद्युत प्रवाह देणार्‍या 33 के.व्ही.विद्युत तारा ह्या जमीनीपासून 7 फुट अंतरावर आहे. त्याच प्रमाणे पुढे सप्लाय घेवून जाणार्‍या तारा 5 फुटाच्या अंतरावर आहे. पिक वाढायला लागल्यावर अगदी तारेपर्यंत पोहंचतात. अशा वेळेस सदरील तारेच्या भितीने मजूर शेतात काम करण्यास नकार देतात. सदरील प्रकरणात मा.इंजिनियर साहेब, पांगरा फिटर, बिडकीन येथे श्री बाबासाहेब हिवाळे यांनी वारंवार तक्रारी केल्या परंतु कोणीही त्यांना दम देण्यास तयार नाही. सदरील भाग कायम ओलीताखाली असतो. परंतु ओलसर भाग असल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. सदरील भागात रात्रीच्या वेळेस विज असल्याने रात्री-बेरात्री शेतात पिकांना पाणी देण्यास जावे लागते. त्यामुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. उद्या जर एखाद्याचे प्राण गमवावे लागल्यास त्याला जवाबदार कोण? अधीच शेतकर्‍यांची परिस्थिती खरात त्यात हा जिव घेणा त्रास यावर लवकर कार्यवाही करावी अशी मागणी श्री बाबासाहेब हिवाळे यांनी केली आहे.

Wednesday, October 23, 2019

पंकजाताईंच्या रॅलीत का गेलीस? असे विचारात धनंजय मुंडे समर्थकांची महिलेला घरात घुसून मारहाण



ना. पंकजाताई मुंडे यांनी दिल्या तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना
बीड : राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या परळी विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर आता एक नवीनच प्रकार समोर आला आहे.पंकजाताई मुंडे यांच्या रॅलीत का गेलीस? अशी विचारणा करत असहाय महिलेला तिच्या घरात घुसून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली आहे.

यामध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक सुर्यभान मुंडे व त्यांच्या आठ साथीदारांविरूध्द ग्रामीण पोलीसांनी परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी सुर्यभान मुंडे व इतर आठ जणांविरुध्द भादवि कलम ४५२, ३५४, १४३, ३२३, ५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.सुर्यभान मुंडे हे धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक आहेत.हाती आलेल्या माहितीनुसार,रेखा बालासाहेब मुंडे असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव असून ती तळेगांव ता. परळी येथील रहिवासी आहे.यासंदर्भात तिने पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,२२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वा. सुमारास रेखा मुंडे घरात स्वयंपाक करत असताना गावांतील सुर्यभान हनुमंत मुंडे, त्यांचे बंधू ऋषीराज, सुभाष तसेच दिलीप मुंडे, ओमप्रकाश मुंडे, राहूल मुंडे, विष्णू व प्रदीप सूर्यकांत मुंडे सर्व रा.तळेगांव या सर्वांनी घरात घुसून तु पंकजाताई मुंडे यांच्या रॅलीत का गेलीस? त्यांना भेटायला परळीत का गेलीस? असे विचारत तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून चापट, बुक्क्या व लाथाने बेदम मारहाण केली.एवढेच नव्हे तर या सर्वांनी मिळून तिचा विनयभंगही केला.

कजाताईंनी घेतली तात्काळ दखल

या प्रकरणाची माहिती पंकजाताई मुंडे यांना मिळाल्यानंतर याची गंभीर दखल घेत महिलेच्या पाठिशी उभे राहून पोलिस प्रशासनास तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच,महिलांवरील अशा घटना यापुढे माझ्या मतदारसंघात खपवून घेतला जाणार नाहीत असे सांगितले आहे.विधानसभा निवडणूकीचा निकाल लागण्यास अजून दोन दिवस शिल्लक असताना अशा प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

Sunday, October 20, 2019

मतदारसंघाबाहेरील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळीत फिरण्यास प्रतिबंध करावा- धनंजय मुंडे यांची मागणी


परळी : सोमवारी दि. 21 ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानासाठी परळी शहरात भाजपा पक्षाकडून मतदारसंघाबाहेरील असंख्य गुंड प्रवृत्तीचे लोक बोलवण्यात आले आहेत, अशा मतदारसंघाबाहेरील व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळी शहर व मतदारसंघात फिरण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

1 . परळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवावा,
2. संवेदनशील असलेल्या शहरातील बुथ क्र. 162 बोरणा ऑफीस मध्य बाजु, बुथ क्र. 163 बोरणा ऑफीस पश्‍चिम बाजु येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत व विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, 
3. विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणात शहरात आणण्यात आली आहेत, त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेत आडथळा आणला जावू शकतो, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील त्या लोकांना फिरण्यास प्रतिबंध करावा.
4.आमच्या विरोधातील उमेदवार स्वतःच स्वतःच्या लोकांकडून हल्ले करवून घेवून त्यात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ एक व्हिडीओ कॅमेरामन देऊन काही घटना घडल्यास त्याचे चित्रीकरण करावे व त्यांनाही विशेष पोलीस सुरक्षा द्यावी, जेणेकरून खोट्या तक्रारी होणार नाहीत.
5.मतदारसंघातील संवेदनशील गावे भोपळा, मांडेखेल, गोपाळपूर, साबळा कौडगाव अशा संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा विरोधकांचा डाव आहे, त्यामुळे तेथेही विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा आदी मागणी करण्यात आल्या आहेत.
श्री.मुंडे यांच्या वतीने त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन दिले आहे.  तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व निवडणूक आयोगालाही याबाबत कळविण्यात आले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क करून या मागण्या केल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्या खोट्या क्लिप प्रकरणी भाजपाच्या सोशल मीडिया टीमविरुद्ध गुन्हा दाखल

परळी : परळी विधानसभेची निवडणूक अखेर भावनिक मुद्द्यावर येऊन ठेपली आहे, "त्या" कथित व्हायरल क्लिप प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वतीने काल (दि. १९) रात्री उशिरा फिर्याद देण्यात आली होती, त्याप्रकरणी आज अखेर भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
काल निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना अखेरच्या काही मिनिटात धनंजय मुंडे यांची दि. १७ रोजीच्या प्रचारसभेत बोललेल्या वक्तव्याच्या व्हीडिओ क्लिपला भलताच रंग देऊन भाजपच्या सोशल मीडिया टीम कडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी बोललेल्या मूळ वक्तव्याला संकलित (एडिट) करून प्रसारमाध्यमामध्ये निवडणुकीत उमेदवार असलेल्या धनंजय मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरवले असून ही बाब श्री मुंडे यांच्या निवडणुकीवर परिणाम करणारी असल्यामुळे याविरोधात तात्काळ गुन्हा नोंद करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. 
परळी शहर पोलिसांनी या प्रकरणी भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४६९, ३४ व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबाबत आज (दि.२०) सकाळी पत्रकार परिषद घेत या विषयाचा खुलासा केला आहे. ती व्हायरल क्लिप मूळ भाषण संकलित करत जाणीवपूर्वक दोन दिवस उशिरा पसरवली आहे; भाजपकडून काही ठराविक लोकांकडून मला राजकारणातून संपवण्याचा हा डाव असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर अगोदरच दोन्ही मुंडे परिवारातील संबंध ताणलेले असताना अशा गोष्टी जाणीवपूर्वक पसरवल्या असून आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या सर्व घडामोडीनंतर आता प्रशासन भाजप सोशल मीडिया टीम विरुद्ध कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.