Tuesday, November 12, 2019

महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण


औरंगाबाद ः- महावितरणचा गलथान कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून याबाबत लवकर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.? या प्रकरणाची माहिती अशी की, बाबासाहेब बाबुराव हिवाळे (रा.पाटोदे वडगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद) येथे राहत असून गट नं.35 मध्ये त्यांची शेत जमीन आहे. सदरील जमीनीतून इलेक्ट्रीकल टॉवर लाईन गेलेली असून त्याच टॉवरच्या लाईनच्या खालुन डी.पी.मध्ये येणारी विद्युत प्रवाह तार गेलेली आहे. त्या डिपीतून विद्युत प्रवाह देणार्‍या 33 के.व्ही.विद्युत तारा ह्या जमीनीपासून 7 फुट अंतरावर आहे. त्याच प्रमाणे पुढे सप्लाय घेवून जाणार्‍या तारा 5 फुटाच्या अंतरावर आहे. पिक वाढायला लागल्यावर अगदी तारेपर्यंत पोहंचतात. अशा वेळेस सदरील तारेच्या भितीने मजूर शेतात काम करण्यास नकार देतात. सदरील प्रकरणात मा.इंजिनियर साहेब, पांगरा फिटर, बिडकीन येथे श्री बाबासाहेब हिवाळे यांनी वारंवार तक्रारी केल्या परंतु कोणीही त्यांना दम देण्यास तयार नाही. सदरील भाग कायम ओलीताखाली असतो. परंतु ओलसर भाग असल्याने विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. सदरील भागात रात्रीच्या वेळेस विज असल्याने रात्री-बेरात्री शेतात पिकांना पाणी देण्यास जावे लागते. त्यामुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. उद्या जर एखाद्याचे प्राण गमवावे लागल्यास त्याला जवाबदार कोण? अधीच शेतकर्‍यांची परिस्थिती खरात त्यात हा जिव घेणा त्रास यावर लवकर कार्यवाही करावी अशी मागणी श्री बाबासाहेब हिवाळे यांनी केली आहे.