परळी : येथिल नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगॅवेट क्षमतेचा संच क्रमांक ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसापासुन बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे केवळ एकच संच चालु असुन या संचातुन शनिवारी सायंकाळी १४७ मेगॅवॅट एवढे विजेचे उत्पादन चालु होते.राज्यात विजेचे उत्पादन जास्त व मागणी कमी या कारणामुळे महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीच्या मूंबई येथिल कार्यालयातुन संच बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या.त्यामुळे परळीचे दोन संच बंद ठेवण्याचा निर्णय परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी घेतला आहे.
मराठवाडयाचे भुषण असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मॅगॅवॅट क्षमतेचे संच क्रमांक ३,४,५, हे तीन संच गेल्या वर्षापासुन बंद असल्याने होणारी विजनिर्मिती ठप्प झाली आहे.संच बंदमुळे येथिल विजकंद्राचा अधिकारी कर्मचारयांचा स्टाफ विदर्भातील व नाशिकेतील औष्णिक विद्युत केद्रात हलविला आहे.तसेच विद्युत कंद्रात रोजंदारीने काम करणारया कामगारांच्या ही हाताला काम उपलब्ध नाही,कंत्राटी कामगारही परळीतुन पुणे मुंबई औरंगाबाद येथे स्थलांतरीत झाला आहे.भाजप,सेनेचे राज्यात परळीत गेल्या चार वर्षात एकही नविन प्रकल्प उभारला नाही.उलट आहे ते परळी औष्णिक विद्युत कंद्रातील जुने ३ संच बंद ठेवले.त्याचा परळीच्या बाजारपेठीतील उलाढालीवर मोठा परिणाम जाणवत असुन अनेकांच्या व्यवसायात घट झाली आहे.
दाउतपुर येथिल नविन परळी औष्णिक विद्युत कंद्रातील २५० मॅगॅवॅट क्षमतेचे संच क्रमांक ६,७,८, हे तीन संच चालु होते.या पैकी दोन संच आठ दिवसापासुन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात परळीचे मुख्य अभियंता विठठल खटारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विजेची मागणी पावसाळयात कमी होते.त्यामूळे वरिष्ठांच्या निर्णयानुसार परळीचे दोन संच बंद ठेवण्यात आले आहेत.व संच क्रमांक ८ हा एक संच चालु असुन या एका संचातुन विजनिर्मिती सरू असल्याचे त्यांनी सांगितले
राज्यात व कें द्रात भाजपची सत्ता असतानाही सत्ताधारयांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्प बंद पाडण्याचे काम केले पालकमंत्री आणि परळी विधान सभा मतदार संघाच्या आमदारांनी नविन प्रकल्प आणले नाहीत उलट बंद असलेले संच सुरू केले नाहीत.असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नामोल्लेख न करता परळीच्या आमदारांना केला आहे.आपण सत्ता नसतानाही परळी मतदार संघातील कामगारांना सौर उर्जेचा प्रकल्प परळी तालुक्यात आणला आहे.या प्रकल्पाचे उदघाटन ही झाले आहे.असे माहिती ही धनंजय मुंडे यांनी दिली.परळी तालुक्यातील सारडगाव व कासारवाडी येथे विकास कामाच्या दौरयात बोलताना धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक केंद्राचा मुदा उपस्थित केला.