Monday, July 2, 2018

विष्णू शेंडगे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : परळी संभाजीनगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी विष्णू शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा पुष्पहार, पेढा भरून सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर आज शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव झाला. तसेच केक कापुन वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला.
   शहरातील नेहरु चौक  येथे दिपक तादंळे, प्रणव परळीकर, लक्षन परळीकर, महादेव शिंदे यांच्या हस्ते फेटा बांधुन, केक कापुन, चांदीच्या रथ नेहरु चौक ते स्नेह नगर भव्य अशी ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणुक काढुन  भव्य सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्कार शाळेचे सचिव दिपक तांदळे, मुशिर पठाण, साहेबराव फड, बालाजी होळंबे, महादेव शिंदे, साहेब भोसले, कारभारी शिंदे, समाधान भाजीभाकरे, राजेभाऊ तिळकरी, कैलास सोळंके, सुर्यकांत कातकडे, अजय निर्मळ, अक्षय कानडे, गणेश तांदळे, गिरी महाराज, प्रणव परळीकर, श्रीराम मरळ, ऋषिकेश राऊत, लक्षन परळीकर, वैजनाथ मुंडे, सुनिल तळेकर, नंदुसेठ मुंदडा, लव्हारे मामा,उध्दव गित्ते सर्व चांदापुर तलाव स्वमींग कल्बचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितीत मान्यवरांनी पोलीस कर्मचारी विष्णू शेंडग यांना शुभेच्छा दिल्या.
कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी विष्णू शेंडगे यांचा वाढदिवस परळी शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला परळी शहरात पोलीस कर्मचार्‍याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी विष्णू शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पोलीस कर्मचारी विष्णू शेंडगे यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्या सर्वांचे पोलीस कर्मचारी विष्णू शेंडगे  यांनी आभार मानले असुन या शुभेच्छांच्या बळावर आपण आणखी उमेदिने आरोग्य, सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक कार्य करु असे त्यांनी म्हटले आहे.