Friday, May 25, 2018

जीवघेणी इंधनदरवाढ व महागाई च्या निषेधार्थ अाज रा. काँ.चे परळीत आंदोलन - बाजीराव धर्माधिकारी



जीवघेणी इंधनदरवाढ व महागाई च्या निषेधार्थ शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीत आंदोलन

ढकलगाडी पदयात्रा व अच्छे दिन प्रमाणपत्र देऊन करणार सरकारविरुद्ध  निदर्शने

परळी : प्रतिनिधी
           आज देशात प्रचंड महागाई वाढली आहे , अच्छे दिनच्या नावाखालीा जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे .कर्जमाफी च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली.शेतकऱ्यांच्या शेतमालाला  भाव मिळत नाही. दररोज पेट्रोल व डिझेल दरवाढ होत आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या जीवघेणी इंधनदरवाढ व महागाई च्या निषेधार्थ शनिवारी(दि. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने परळीत आंदोलन करण्यात येणार आहे. या मध्ये प्रतिकात्मक गाड्या ढकलत ढकलगाडी पदयात्रा काढून अच्छे दिन प्रमाणपत्र देऊन करणार सरकारविरुद्ध  विडंबन निदर्शने करण्यात येणार आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
           पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता पेट्रोल 86 रूपये प्रतिलिटर झालं आहे. सर्वसामान्य माणूस या वाढलेल्या दरांमुळे मेटाकुटीला आला आहे. दररोज वाढणार्‍या या दरांमुळे सामान्य माणूस बेजार आहे. भाजपच्या सरकार कडून अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची सातत्याने फसवणूक केली जात आहे .वाढती महागाई, इंधन दरवाढ, फसवी शेतकरी कर्जमाफी यासह सर्वच पातळीवर हे सरकार अपयशी झाले असून हेच का अच्छे दिन हा सवाल विचारत अच्छे दिन प्रमाणपत्र देऊन करणार सरकारविरुद्ध  विडंबन निदर्शने करण्यात येणार आहेत. शनिवार दि. २६ मे रोजी सकाळी १० वा.राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक ते  शिवाजी चौकापर्यंत ढकलगाडी पदयात्रा  काढण्यात येणार आहे. तसेच शहरातील पेट्रोल पंपांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
      तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.