Friday, May 25, 2018

ना पंकजाताई मुंडे यांच्यामुळे बचतगटांना मिळाली नवीन उद्योगाची संधी



ना पंकजाताई मुंडे यांच्यामुळे बचतगटांना मिळाली नवीन उद्योगाची संधीबंजारा आर्टनंतर परळीतील महिलांना आता ज्यूट बॅग निर्मितीचे प्रशिक्षण परळी : प्रतिनिधीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील असणा-या राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी मतदारसंघातील बचतगटांना नवनवीन उद्योगाची संधी प्राप्त करून दिली आहे. बंजारा आर्टनंतर परळीतील महिलांना त्यांनी आता ज्यूट बॅग व त्यावरील कलाकुसरीचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे, विविध गावांतील वीस महिलांनी या प्रशिक्षणाचा नुकताच लाभ घेतला.     पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अधिका-यांची एक बैठक नुकतीच मुंबईत घेवून परळी व अंबाजोगाई तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना बंजारा आर्ट, ज्यूट बॅग व खवा उत्पादन करण्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार  बंजारा समाजातील तीस महिलांनी ७ ते १७ मे दरम्यान अत्याधुनिक शिलाई मशीनवर दहा दिवसांचे प्रशिक्षण गोपीनाथ गडावर पूर्ण केले होते, त्यानंतर आता ज्यूट बॅगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  ज्यूट बॅग पर्यावरणपूरक शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे पर्यावरण पूरक ज्यूट बॅगची मागणी सध्या प्रचंड असल्यामुळे बॅग निर्मितीला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे मतदारसंघातील बचतगटांच्या महिलांना  ज्यूट बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात येत आहे. २१ ते २५ मे दरम्यान सुरू केलेल्या या प्रशिक्षणात बचतगटांच्या २० महिलांनी सहभाग घेतला आहे. ज्यूट बॅग तयार करून त्यावर सुंदर नक्षीकाम या महिला करत आहेत. ना. पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथ गडावर त्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. परळीत होणार राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र ज्यूट बॅगचे प्रशिक्षण देणा-या महिला इतर महिलांना प्रशिक्षण देतील व सदर उद्योगामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. याकरिता आवश्यक त्या बाबींवर महिलांना मदत करणे व उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे निर्देश ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले आहेत. सदर उत्पादनांसाठी परळी येथे भविष्यात बंजारा व ज्यूट आर्ट वर्कचे   प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असून त्याद्वारे राज्यासह देशभरातील महिलांना  प्रशिक्षण देण्याचं काम येथून होईल असे  त्या म्हणाल्या.