Friday, June 8, 2018

किरण गित्ते इंस्टीटयुटचा प्रथमेश कराड 100 टक्के गुण घेऊन बीड जिल्हयात पहिला

100 टक्के निकाल देऊन 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
महानगर आयुक्त किरण गित्ते, अध्यक्षा सौ. उषाताई गित्ते यांनी केले अभिनंदन


परळी : प्रतिनिधी
किरण गित्ते इंस्टीटयुटचा 10 वीच्या परीक्षेत 100 % निकाल लागला असुन प्रथमेश संजय कराड हयाने 100 टक्के गुण मिळवून जिल्हयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.  कु.मानसी तोतला हिने 98.60 % गुण मिळवून तालुक्यातून दुसरी आलेली आहे. यश विनोद सारडा हयाने 97.20  गुण मिळवून 3 रा क्रमांक पटकावला आहे. स्वप्नील अहीरे याने 96.81 %, ओंकार इंदाणी 96 %, सुमीत गायकवाड 94.80 %, प्रथमेश मिटकरी 94 %, श्रीनाथ गुट्टे 93.60 %, प्रज्वल बास्टेवाड 93.20 %, शशांक चाटे 80.20 % गुण मिळवून गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले.
पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी फोन करून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले व परळी शहराचा नावलौकिक शैक्षणिक क्षेत्रात असाच राखुन ठेवावा हयाबद्दल पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषा किरण गित्ते यांनी विद्यार्थ्यांचे बुके व पेढा देऊन पालकांसह अभिनंदन केले. किरण गित्ते इंस्टीटयुट चा 10 वीचा पहीलाच रिझल्ट हा राज्य पातळीवर जाऊन पोहचला आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये 100 पैकी 100 गुण घेणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच वर्षात यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यां सोबतच किरण गित्ते इंस्टीटयुटच्या संपूर्ण प्राध्यापकांचे त्यांनी कौतुक केले.
किरण गित्ते इंस्टीटयुटचे डायरेक्टर प्रमोद पांडे यांनी परळीतील विद्यार्थी व पालकांना आवाहन केले की तुम्ही आमच्या शिकवण्याच्या पध्दतीवर विश्‍वास ठेवा, फक्त बोर्डामध्येच नाहीतर विविध स्पर्धात्मक परीक्षां सोबतच आय.आय.टी./झी/नीट च्या परीक्षेकरीता सुरूवातीपासूनच तयारी करून घेतो व लवकरच किरण गित्ते इंस्टीटयुटचे विद्यार्थी आय.आय.टी./झी/नीट परीक्षेत सुद्धा आपले सर्वोच्च स्थान मिळवतील.नुकत्याच झालेल्या झी मेन परीक्षेत किरण गित्ते इंस्टीटयुटचे 90 पैकी 65 प्रश्‍न आलेत तर नीट-2018 मध्ये 180 पैकी 151 प्रश्‍न आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फक्त शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीनुसार आपला अभ्यास करावा व आपले स्वप्न पुर्ण करावे असे सांगीतले.प्रथमेश कराड याने आपले मनोगत व्यक्त करतांना सागींतले की, किरण गित्ते इंस्टीटयुटचे शिकवणी वर्ग, डाऊट क्लीअरींग पध्दत व नियमित सराव परीक्षा घेतल्यामुळेच हे यश संपादन करू शकलो.
कु. मानसी तोतला हिने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की शिक्षकांचा मनमिळावूपणा व विद्यार्थ्यां विषयीची आपुलकीच्या जोरावरच मी हे यश संपादन केले. मला असलेल्या प्रत्येक विषयाचे डाऊट शिक्षक अगदी चालता बोलता सहजतेने सोडवुन दयायचे त्यामुळे मला वर्षभर अभ्यासाचा ताण कधी वाटलाच नाही. कारण शिकवतांना सुध्दा संपूर्ण विषय अगदी खोलपर्यंत व विद्यार्थ्यांना समजेपर्यंत शिक्षक शिकवतात.प्रथमेश मिटकरी याच्या पालकांनी संपूर्ण यश हे किरण गित्ते इंस्टीटयुटला दिले.
हया छोटेखानी स्वागत समारोहास विद्यार्थी व पालकां सोबतच प्राध्यापक गोयल सर, तपेश सहा, विक्रमसिंग, अर्चना शमो, पल्लवी फुलारी, सौ.  वरदा पाठक, दिल्ली पब्लिक वर्ल्ड स्कुलचे प्राचार्य तेजस कुमार, प्रदीप खाडे, सुरेश फड, बालाजी दहिफळे, सुधाकर गित्ते, महेश कराड हे उपस्थित होते.