Tuesday, September 18, 2018

शेख गयासोद्दीन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित



परळी (प्रतिनिधी) :  येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख  गयासोद्दीन बद्रोदीन  यांना  जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत  करण्यात आले.  बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा पुरस्कार सोहळा सोमवारी  पार पडला.
 शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा  बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुरस्कार देण्यात गौरव करण्यात येतो .  परळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक शेख  गयासोद्दीन यांना  पालकमंत्री पंकजा मुंडे   याच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन  पुरस्कार प्रदान करण्यात आले.   यावेळी मंचावर जि. प.  अध्यक्षा सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जयश्री मस्के, युद्धजीत पंडीत, संतोष हंगे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, राजेश गायकवाड  यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले .
या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शेख गयासोद्दीन यांना  जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  सन्मानीत करतांना पालकमंत्री पंकजा मुंडे, जि. प.  अध्यक्षा सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख आदी.