पंचशिलनगर शाखेत पालीवाल यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती
परळी : प्रतिनिधी
राजस्थानी मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटीचे चेअरमन व संचालक तसेच कर्मचारी वर्ग अत्यंत विश्वासपूर्ण असून सामान्यांचा आर्थिक विश्वास त्यांनी कमावला आहे म्हणूनच राजस्थानी मल्टीस्टेट हा सर्वसामान्य सभासद व ठेवीदारांसाठी आर्थिक आधार ठरतोय असे मत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांनी व्यक्त केले.
राजस्थानी मल्टीस्टेटच्या पंचशिलनगर शाखेत स्थापन करण्यात आलेल्या श्री गणरायाची आजची आरती शिवसेनेचे मा.शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना श्री.पालीवाल म्हणाले की, सध्या राज्यात पडलेली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता नागरिकांनी आगामी काळात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन करून श्री गणरायाने पाऊस पाडावा असे साकडे घातले. यावेळी शाखा व्यवस्थापक स्वप्नील संजय चोभारकर, लिपीक सौ.अल्पना गुजर, कु.मयुरी गुंडाळे, अभिजीत स्वामी, ईश्वर जठार आदी उपस्थित होते.
