Tuesday, September 18, 2018

समाज प्रबोधनासाठी परळी फेस्टीव्हल सारखे उपक्रम आवश्यक-ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे



परळी प्रतिनिधी :समाजातील प्रत्येक घटकाचे आरोग्य मानसिक व शारिरीक दृष्ट्या जपण्यासाठी अध्यात्म हे सर्वात प्रभावी साधन आहे.समाजाच्या उत्तम आरोग्यासाठी या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या परळी फेस्टीव्हल सारख्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार तथा विनोद सम्राट ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे यांनी केले. 
परळी फेस्टीव्हलचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात ह.भ.प. बाबासाहेब महाराज इंगळे यांनी काल किर्तन सेवा केली. 
नाम वाचे श्रवण किर्ती,।
पाऊले चित्ती समान ।।
काळ सार्थक केला तयांनी ।
धरिला मनी विठ्ठल ।।
या निळोबारायांच्या अध्यात्माची महती सांगणाऱ्या अभंगावर त्यांनी किर्तन केले. नाम श्रवण हे प्रभावी साधन असून त्यातून भगवंताची प्राप्ती होते. वाणीने सतत भगवंताचे नाम घेतल्यास चित्त शुध्द होऊन आत्मिक समाधान मिळते. 
या किर्तन सोहळ्याला महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. एकनाथ महाराज लोमटे मलकापुरकर (यरमाळा) यांच्यासह परळी पंचकृषीतील ह.भ.प.लटपटे महाराज, ह.भ.प. विनायक महाराज गुट्टे गुरूजी, ह.भ.प. भरत महाराज गुट्टे, ह.भ.प.विजयानंद अघाव महाराज, ह.भ.प. वासुदेव महाराज मुंडे, ह.भ.प. रंगनाथ शास्त्री नागरगोजे, ह.भ.प. राजाभाऊ महाराज मुंडे, ह.भ.प.श्रीमंत महाराज मुंडे जिरेवाडीकर, ह.भ.प.रानबा महाराज, ह.भ.प.दत्ता महाराज, ह.भ.प. उध्दव महाराज भोजनकवाडीकर, ह.भ.प.दत्ता महाराज कनसे तपोवनकर, मृदंगाचार्य सनतकुमार बडे, ह.भ.प.प्रा.पंडीत गिरी महाराज,ह.भ.प.अशोक महाराज कराळे, ह.भ.प.माधव महाराज उखळीकर, ह.भ.प.ऍड. दत्ता महाराज आंधळे, ह.भ.प. नानवटे गुरूजी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. 
या किर्तन सेवेला मरळवाडी, मिरवट, मांडवा, नंदनज,सारडगाव, लिंबोटा, पांगरी, मांडेखेल येथील भजनी मंडळांनी साथ दिली. सर्वांचे स्वागत परळी फेस्टीव्हलचे अध्यक्ष तथा मार्केट कमेटी उपाध्यक्ष प्रा.विजय मुंडे यांनी केले.ह.भ.प.बाबासाहेब महाराज इंगळे यांचा सत्कार स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ देवून प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी केला. तसेच ह.भ.प.एकनाथ महाराज लोमटे यांचा सत्कार स्मृतीचिन्ह, शाल श्रीफळ देवून महेश बॅंकेचे संचालक आत्माराम कराड यांनी केला. उपस्थित गुणीजन महाराज मंडळींचा सत्कार जनार्धन गाडे गुरूजी, प्रा.नरहरी काकडे, विट्ठलराव गुट्टे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, नारायणदेव गोपनपाळे, माजी नगर सेवक दत्तात्रय ढवळे  आदिंनी केला.
मेडीलक असोशियशनच्या वतीन श्रीं ची आरती
परळी फेस्टीव्हलच्या वतीने स्थापन केलेल्या श्रीगणेशाची आरती परळी मेडीकल असोशियशनचे डॉ. ज्ञानेश्वर घुगे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे,डॉ. अजय मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.
आज गौरव महाराष्ट्राचा
परळी फेस्टीव्हल मध्ये बुधवार दि.19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या गौराव गाथेचा धगधगता इतिहास सांगणारा लोकगितांचा गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे.