Monday, October 1, 2018

ज्ञानेश्वर पतसंस्थेला खोटा धनादेश दिला ;आरोपीस 3 महिने कारावासाची शिक्षा !




परळी वैजनाथ प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली.
थोडक्यात व्रत असे की परळी येथील सहकारी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आरोपी ज्ञानोबा काशीनाथ चौधरी यांनी ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन दिनांक 21.12. 2004 रोजी रूपये 10 000 कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीकरिता पतसंस्थेला दिनांक.22.01.2007 रोजीचा रुपये 15,665 चा वैद्यनाथ अर्बन को आँपरेटीव्ह बँक शाखा परळीचा धनादेश दिला .सदर धनादेश न वटल्यामुळे फिर्यादी ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन बालाजी अप्पाराव भोईटे यांच्या मार्फत परळी न्यायालयात कलम 138 नि.ई.अँक्टखाली फिर्याद  दाखल केली.
प्रकरणाची सुनावणी  परळी येथील न्यायालयाचे न्यायाधिश श्री. एम. जे.डौले  यांचेसमोर झाली. फिर्यादी पतसंस्थेचा युक्तीवाद मान्य करून आरोपी ज्ञानोबा चौधरी यास उपरोक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.तसेच आरोपींने  फिर्यादी ज्ञानेश्वर पतसंस्थेला रूपये 25000 नुकसान भरपाई एका महिन्यात नाही दिल्यास आरोपीला पुन्हा एक महिना कारावास भोगावा लागणार आहे. दिले.फिर्यादी ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन अँड.आर.व्ही.गित्ते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. वंसतराव फड यांनी सहाय्य केले.