Wednesday, October 3, 2018

कामगार नाट्य स्पर्धेत परळीच्या 'येडी बाभळ' प्रथम तर 'रंग दे बसंती' ला द्वितीय पारितोषिक



प्रदीप भोकरे यांना लेखक व दिग्दर्शनाचे पहिले बक्षीस 

महर्षी कणाद विद्यालयाच्या मुलींना घवघवीत यश 







परळी (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट कार्यालय लातूर तर्फे आयोजित महिला नाट्य स्पर्धेत परळीच्या महर्षी कणाद विद्यालयाच्या संघाने रंगकर्मी प्रदीप भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येडी बाभळ  हे नाटक सादर केले होते.  कामगार कल्याण मंडळाच्या महिला नाट्य स्पर्धेत 'येडी बाभळ'  या एकांकिकेला सांघिक प्रथम पारितोषिक मिळाले.  तर बालनाट्य स्पर्धेत 'रंग दे बसंती' या नाटकाला सांघिक  द्वितीय बक्षीस मिळाले.  येडी बाभळ या नाटकाच्या लेखक व दिग्दर्शनासाठी प्रदीप भोकरे यांना प्रथम बक्षीस मिळाले.  रंग दे बसंती नाटकाच्या  दिग्दर्शनासाठी पूजा शिवगण हिला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
 या स्पर्धेत लातूर, बीड व  उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ नाट्य संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना ( दि. १ ऑक्टो. ) लातूर येथील कामगार कल्याण भवनात मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले.
 या नाटकात महर्षी कणाद विद्यालयाच्या मयुरी रूददेवाडी, सोनाली बनसोडे, प्रतीक्षा खोसे, कांचन काबरा, दिशा वेडे, गायत्री भैड, प्राची रायभोळे, स्नेहा टेकाळे, प्राप्ती ढाकणे, अमृता शिवगण, पायल पवार, कांचन चौधरी, पूजा शिवगण, अर्चना खेडकर, निकिता धोत्रे, सुचिता गुंडाळे, पंकजा नागरगोजे, विद्या वेडे, निकिता मोरे, निकिता जाधव, मनीषा तिडके, साक्षी त्रिवेदी, पायल पांचाळ, गीतांजली लव्हारे,  पायल भोयटे या विद्यार्थिनींनी अभिनय केले. राजेश मुंडे, निवृत्ती मुंडे, माणिक गडदे, बालाजी कांबळे यांनी तांत्रिक सहाय्य केले.
 या सर्व विद्यार्थिनींचे संस्थापक भांगे गुरुजी, मुख्याध्यापिका मंगला भांगे, नाट्यपरिषदेचे बाजीराव धर्माधिकारी,  केंद्र संचालक आरेफ शेख,  आबासाहेब वाघमारे, सिद्धार्थ तायडे आदींनी  अभिनंदन केले.

परळीच्या नाट्य संघाने  मिळविलेले बक्षीसे

प्रथम             : येडी बाभळ

द्वितीय           : रंग दे बसंती

प्रथम : ( लेखक व दिग्दर्शन) प्रदीप भोकरे (येडी बाभळ)

प्रथम  : ( दिग्दर्शन) पुजा शिवगण  ( रंग दे बसंती)

प्रथम : (अभिनय) मयुरी रूददेवाड    



फोटो क्यापशन:  कामगार कल्याण मंडळाच्या नाट्य स्पर्धेत पारितोषिक स्विकारतांना कलावंत.