जवाहरलाल एज्युकेशन सोसायटी आयोजित लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतिने इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी उपयुक्त असा सेमिनार कार्यक्रम आयोजित केला आहे.
नववी व दहावी बोर्ड परीक्षेची तयारी ,बदललेले दहावी बोर्ड परीक्षेचे स्वरूप,नवीन अभ्यासक्रम त्याची व्याप्ती,अभ्यासाची पद्धत ( शेवटच्या 4 महिन्याचे नियोजन, कृतीयुक्त अध्यापन/ अध्ययन कृतीपत्रिका स्वरूप व व्याप्ती नवी मूल्यमापन पद्धती , ज्ञानरचनावाद ,इंग्रजी व गणित विषयाची भीती ,दहावी बोर्ड पॅटर्न मध्ये झालेला बदल, पाल्याच्या अभ्यासात पालकांची जबाबदारी या सर्व विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीने भव्य सेमिनारचे आयोजन केले आहे. या सेमिनारचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. सदस्य एस.एस बोर्ड पुणे (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) अ.ल. देशमुख तसेच मा.श्री.डॉ. उमेश प्रधान शिक्षण तज्ञ, पुणे दहावी बोर्ड परीक्षेची तयारी, शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचे मार्क, अभ्यास कसा करावा की ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना आपले मार्क/ गुण वाढवण्यास होणार आहे. या सर्व विषयांवर अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी दि.२८/१०/२०१८. रोजी रविवारी सकाळी १० वाजता वैद्यनाथ कॉलेज परळी येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
परळीचा व परळी परिसरातील शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरील अभ्यासक्रमाचा विविध विषयातील तज्ञांच मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन विद्यार्थीना याचा गुणवता वाढीसाठी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून अॕकडमी कार्यक्रम घेत असते या उपक्रमामुळे परिक्षापुर्व तयारीला संपुर्णतः मदतच होत आहे.
तरी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या कार्यक्रमास जास्तीत जास्त परळी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जवाहरलाल एज्युकेशनचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.